• Download App
    रेल्वेतर्फे 5600 आयसोलेशन कोच ; कोरोना रुग्णांवर उपचार, क्वारंटाईनसाठी वापर। 5600 isolation coaches by railways

    रेल्वेतर्फे ५६०० आयसोलेशन कोच ; कोरोना रुग्णांवर उपचार, क्वारंटाईनसाठी वापर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोना रुग्णांच्या मदतीला रेल्वे धावली असून 5600 आयसोलेशन कोचेस तयार करणार आहे. या आयसोलेशन कोचचा वापर प्रामुख्याने कोरोना रुग्णांवर उपचार आणि क्वारंटाईनसाठी होत आहे. दिल्ली तसेच महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यात मागणीनुसार कोचचा वापरही सुरु झाला आहे. 5600 isolation coaches by railways



    रेल्वेने गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर जुन्या कोचेसचे रूपांतर छोटेखानी आरोग्य केंद्रात करण्यास सुरूवात केली होती. मध्य आणि पश्चिम रेल्वेने एक हजार आयसोलेशन कोचेस तयार करून सुसज्ज ठेवले होते. गेल्यावर्षी कोचना मागणी नव्हती. परंतु आता शहराबरोबरच ग्रामीण भागातही आरोग्य परिस्थिती चिंताजनक बनल्यामुळे या कोचचा वापर सुरू झाला आहे. हे कोचेस राज्यातील नंदुरबार जिह्यात वापरले आहेत.

    नंदूरबारमध्ये 32 जणांवर उपचार

    दिल्लीतील शकुरबस्तीत 50 कोचेस (800 बेड्स)तर आनंदविहार येथे 25 कोचेस (400बेड्स) सुसज्ज ठेवले आहेत. तर महाराष्ट्रात नंदूरबार रेल्वे स्थानकात 21 कोचेस (378बेड्स) वर 32 पेशंटवर उपचार सुरू असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.

    5600 isolation coaches by railways

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही