• Download App
    काश्मीरच्या बारामुल्लामध्ये 30 वर्षांचे रेकॉर्ड तुटले दहशतवाद्यांना धुडकावून 54.67 % मतदान!!|54.67% polling in Kashmir's Baramulla breaks 30-year-old record defying terrorists!!

    काश्मीरच्या बारामुल्लामध्ये 30 वर्षांचे रेकॉर्ड तुटले दहशतवाद्यांना धुडकावून 54.67 % मतदान!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जम्मू – काश्मीर मधून 370 कलम हटविल्यामुळे राज्यातल्या जनतेत प्रचंड नाराजी असल्याचा दावा फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला यांच्यासारख्या नेत्यांनी केला, तरी प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आधी श्रीनगर मधले रेकॉर्ड तुटले. आज बारामुल्ला मतदारसंघातले रेकॉर्ड तुटले. जम्मू – काश्मीरच्या मतदारांनी घराबाहेर पडून दहशतवाद्यांना धुडकावत लोकसभा निवडणुकीत भरघोस मतदान केले.54.67% polling in Kashmir’s Baramulla breaks 30-year-old record defying terrorists!!



    लोकसभा निवडणुकीच्या आधीच्या टप्प्यात श्रीनगर मध्ये 30 वर्षांचे रेकॉर्ड तोडून मतदारांनी उत्साहाने मतदान केले. त्याची टक्केवारी 37.98 % नोंदवली गेली, तर आज बारामुल्ला मतदारसंघात 54.67 % मतदानाची नोंद झाली.

    काश्मीर मधल्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपच्या एका माजी सरपंचाची हत्या केली. त्याचवेळी दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये दोन पर्यटकांना गोळ्या घातल्या मतदानामध्ये अडथळे आणण्याचा हा प्रयत्न होता. परंतु, प्रत्यक्षात बारामुल्लांच्या मतदारांनी दहशतवादांचा हा प्रयत्न हाणून पाडत भरघोस मतदान करत 30 वर्षांचे रेकॉर्ड तोडले. 1994 मध्ये बारामुल्ला मतदारसंघात 29 % मतदान झाले होते.

    54.67% polling in Kashmir’s Baramulla breaks 30-year-old record defying terrorists!!

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    MP High Court : एमपी हायकोर्टाने म्हटले- प्रोबेशनमध्ये वेतन कपात करणे अवैध, कर्मचाऱ्यांना थकबाकीसह पैसे परत करण्याचे आदेश

    Shashi Tharoor : ‘मी नेहरूंचा अंध समर्थक नाही, पण त्यांची लोकशाहीतील भूमिका अमूल्य’ – शशी थरूर यांची भाजपवर संयत टीका

    Shashi Tharoor : शशी थरूर म्हणाले- नेहरूंच्या चुका स्वीकारणे आवश्यक, पण प्रत्येक समस्येसाठी त्यांना एकट्याला दोषी ठरवणे चुकीचे