• Download App
    गुजरातमध्ये 1000 कोटींचे 513 किलो MD ड्रग्ज जप्त!!; मुंबई पोलिसांची कारवाई 513 kg of MD drugs worth 1000 crore seized in Gujarat

    गुजरातमध्ये 1000 कोटींचे 513 किलो MD ड्रग्ज जप्त!!; मुंबई पोलिसांची कारवाई

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातमध्ये मोठी कारवाई केली असून भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात ड्रग्ज तयार करणारा कारखाना उघडकीस आणला आहे. मुंबई पोलिसांनी जवळपास 513 किलोचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून या अंमली पदार्थाची किंमत 1026 कोटी रूपये इतकी आहे. पोलिसांनी एका महिलेसह 7 जणांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या वरळी युनिटने ही कामगिरी केली आहे.
    513 kg of MD drugs worth 1000 crore seized in Gujarat

    गेल्या काही महिन्यापासून मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थविरोधी पथकाची अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू आहे. याच कारवाईमध्ये काही महिन्यांपूर्वी शिवाजी नगर भागातून अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला होता. पोलिसांनी गोवंडीतील शिवाजी नगर येथून मार्च 2022 मध्ये पहिल्या आरोपीला अटक केली त्यांच्या कडून 250 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी 700 किलो अंमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली होती.

    या प्रकरणाचा तपास करताना अंमली पदार्थ पुरवठ्याचे धागेदोरे गुजरातमध्ये असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर अंमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातमधील अंकलेश्वर भागात कारखान्यावर छापा मारला. यावेळी पोलिसांनी 513 किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. पोलिसांनी सात जणांना अटक केली असून यात एका महिलेचा समावेश आहे. त्यातील 5 जणांना न्यायलयीन कोठडीत पाठवण्यात आले. तर दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे सोपवण्यात आले आहे. अंमली पदार्थाची तस्करी करणारी ही आंतरराज्य टोळी असावी असा पोलिसांनी संशय आहे. ही टोळी काही राज्यांमध्ये कार्यरत असून युवकांना लक्ष्य करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

    513 kg of MD drugs worth 1000 crore seized in Gujarat

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र