• Download App
    Corona Update India : देशात २४ तासांत ५० हजारांहून अधिक बाधितांची नोंद ; सक्रिय रुग्णसंख्या ६ लाखांहून अधिक|50,000 victims registered in the country in 24 hours; More than 6 lakh active patients

    Corona Update India : देशात २४ तासांत ५० हजारांहून अधिक बाधितांची नोंद ; सक्रिय रुग्णसंख्या ६ लाखांहून अधिक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काही होत आहे. परंतु, धोका कायम आहे. कारण देशात पुन्हा ५० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.50,000 victims registered in the country in 24 hours; More than 6 lakh active patients

    आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत  ५४,०६९ नवे रुग्ण आढळले आहेत. १३२१ जणांचा मृत्यू झाल. मंगळवारी५० ८४८ बाधितांची नोंद झाली होती. तसेच २४ तासांत ६८,८८५ लोक कोरोनामुक्त झाले आहेत.



    देशात सलग ४२ व्या दिवशी नव्या रुग्णांहून अधिक कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा आहे. २३ जूनपर्यंत देशभरात ३० कोटी १६ लाख लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात ६४लाख ८९ हजार डोस दिले आहेत. तसेच आतापर्यंत ३९ कोटी ७८ लाखांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत. काल दिवसभरात १९ लाख टेस्ट केल्या आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांहून अधिक आहे.

    देशातील आजची कोरोना स्थिती : 

    • एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी ८२ हजार ७७८
    • कोरोनामुक्त : दोन कोटी ९० लाख ६३ हजार ७४०
    • एकूण सक्रिय रूग्ण : ६लाख २७ हजार ५७
    • एकूण मृत्यू : ३लाख ९१ हजार ९८१

    50,000 victims registered in the country in 24 hours; More than 6 lakh active patients

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य