• Download App
    50 आमदार, हजारो शिवसैनिक, भाविकांसह मुख्यमंत्री एकनाद शिंदेंची शरयु नदीची महाआरती50 MLAs, thousands of Shiv Sainiks, devotees along with Chief Minister Eknad Shinde's Maha Aarti of Sharayu River

    50 आमदार, हजारो शिवसैनिक, भाविकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शरयु नदीची महाआरती

    प्रतिनिधी

    अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार यांचा रविवार, ९ एप्रिल रोजी अयोध्या दौरा होता, या दौ-याच्या शेवटी हजारो शिवसैनिक, आमदार खासदार आणि भाविक यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी शरयु नदीची पूजा आणि महाआरती केली. 50 MLAs, thousands of Shiv Sainiks, devotees along with Chief Minister Eknad Shinde’s Maha Aarti of Sharayu River

    यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अनेकदा मी दौ-याच्या आयोजनासाठी अयोध्येत यायचो, पण आज मुख्यमंत्री म्हणून मी दौ-याला आलो. येथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दौ-याचे उत्तम आयोजन केले. सर्वांच्या सहाय्याने हा दौरा सफल झाला आहे. अयोध्या हा आमच्यासाठी श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. हा राजकारणाचा विषय नाही.

    इथे राम मंदिर व्हावे, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्र होते. मी प्रोटोकाॅल न पाळता लोकांमध्ये गेलो त्यामुळे पोलिसांची गैरसोय झाली, पण जनतेत जाणे हेच माझे टाॅनिक आहे. पंतप्रधान मोदी यांचे हे स्वप्न साकार झाले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

    50 MLAs, thousands of Shiv Sainiks, devotees along with Chief Minister Eknad Shinde’s Maha Aarti of Sharayu River

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Election Commission : आज देशभरात SIRच्या तारखा जाहीर केल्या जातील; निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार

    Salman Khan : सलमान खानला दहशतवादी म्हणणारे पत्र व्हायरल; पाकिस्तानने दहशतवादी म्हणून सूचीबद्ध केल्याचा दावा

    Indian Army : भारतीय सैन्याचा 30 ऑक्टोबरपासून पाक सीमेवर सराव; पाकिस्तानने दोन दिवसांपूर्वी आपले हवाई क्षेत्र बंद केले, उड्डाणांवर बंदी