• Download App
    60000 खर्च, 5 वेळा अर्ज करूनही यूपीए सरकारने नाही दिली पद्मश्री, पण मोदींनी दिले सरप्राईज!!; शहा अहमद कादरींच्या भावना|5 times applications, 60000 thousand expenses didn't fetch padmashri, but modi gave me surprise, says shah ahamad kadri

    60000 खर्च, 5 वेळा अर्ज करूनही यूपीए सरकारने नाही दिली पद्मश्री, पण मोदींनी दिले सरप्राईज!!; शहा अहमद कादरींच्या भावना

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पद्म पुरस्कार वितरणानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर संबंधित व्यक्ती आहे तरी कोण??, याची उत्सुकता संपूर्ण देशभरातच नाही, तर प्रदेशातही तयार झाली. मूळचे कर्नाटकचे असलेले शहा अहमद कादरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बातचीत करताना मी यूपीए सरकारच्या काळात 5 वेळा प्रयत्न केले, पण मला पद्म पुरस्कार मिळाला नाही, पण भाजप सरकारमध्ये मी अपेक्षा केली नसतानाही आपण मला पद्मश्री दिले आणि माझे विचार बदलले, अशी खुली कबुली शहा अहमदनगर अहमद कादरी यांनी पंतप्रधान मोदींना दिली.5 times applications, 60000 thousand expenses didn’t fetch padmashri, but modi gave me surprise, says shah ahamad kadri

    त्यानंतर एबीपीसह अनेक वेगवेगळ्या चॅनेल्सनी मुलाखती घेतल्या. त्यामध्ये त्यांनी आपली भूमिका आणखी विशद करून सांगितली.



    शहा अहमद कादरी म्हणाले, की काँग्रेस प्रणित यूपीए सरकारच्या काळात मी 5 वेळा पदरचा खर्च करून पद्मश्री मिळवण्यासाठी अर्ज केले होता. त्या अर्जाबरोबर मोठमोठी प्रोफाइल्स पाठवली होती. ती प्रोफाइल्स तयार करून अर्ज करायला दर वेळेला 12000 रुपये खर्च यायचा. असे 60000 रुपये खर्च करून मी 5 वेळा अर्ज केले. कर्नाटक सरकार, हँडीक्राफ्ट विभाग आणि गृह मंत्रालय यांच्याकडे प्रोफाइल्स पाठवली. तशी पूर्वी पद्धतच होती. पण त्या काळात मला पद्मश्री मिळाली नाही. भाजप सरकार आल्यानंतर भाजप मुसलमानांचा द्वेष करते. ते मुसलमानांना काही देत नाहीत, असे समजून मी अर्ज करणे थांबविले होते. अचानक 25 जानेवारीला गृह मंत्रालयातून मला फोन आला आणि पद्मश्री स्वीकारणार का??, याची विचारणा झाली. त्याच वेळी जोपर्यंत बातमी कन्फर्म होत नाही तोपर्यंत कुठे बोलू नका, असे त्यांनी सांगितले होते. मी पद्मश्री स्वीकारला तयार असल्याचे सांगितल्यानंतर सायंकाळी पद्म पुरस्कारांच्या घोषणेत माझे नाव आले. हे माझ्यासाठी सरप्राईज होते. मोदी सरकार मला पद्म पुरस्कार देईल असे वाटले नव्हते आणि म्हणून मी मोदींना प्रत्यक्ष भेटीत तसे सांगितले. मोदींनी माझा विचार पूर्ण बदलून टाकला.

    आत्तापर्यंत मी माझ्या कुटुंबीयांनी काँग्रेसला मतदान केले. पण आता मोदींच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आणि माझे कुटुंब यापुढे भाजपला मतदान करणार आहे, असे कादरी यांनी स्पष्ट केले. एका पद्म पुरस्कारासाठी तुम्ही भाजपला मतदान केले असा आरोप होईल ना??, असे विचारल्यानंतर कादरी म्हणाले, फार मोठ्या भविष्यकाळातली गोष्ट मी सांगू शकत नाही. पण मोदींविषयी कृतज्ञता भाव म्हणून मी आणि माझे कुटुंबीय यावेळी भाजपला मतदान करणार आहोत. एवढे मी सांगू शकतो, असे कादरी म्हणाले.

    5 times applications, 60000 thousand expenses didn’t fetch padmashri, but modi gave me surprise, says shah ahamad kadri

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य