• Download App
    विदर्भात 2019 पेक्षा 5% कमी मतदान; देशातील मतदानात 8% घट, गतवेळी झाले होते सरासरी 69% मतदान 5% lower turnout than 2019 in Vidarbha; 8% decline in voter turnout in the country, compared to last year's average turnout of 69%

    विदर्भात 2019 पेक्षा 5% कमी मतदान; देशातील मतदानात 8% घट, गतवेळी झाले होते सरासरी 69% मतदान

    वृत्तसंस्था

    मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशात 2019च्या तुलनेत 8 टक्के तर महाराष्ट्रात 4.85% कमी मतदान झाले. वाढते तापमान याचे प्रमुख कारण सांगितले जाते. पहिल्या टप्प्यातील देशातील 102 जागांवर 62% मतदान झाले. मागील वेळी 69.96% मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात नितीन गडकरी यांच्यासह 8 केंद्रीय मंत्री आणि 2 माजी मुख्यमंत्र्यांसह एकूण 1625 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले. निकाल 4 जूनला लागणार आहे 5% lower turnout than 2019 in Vidarbha; 8% decline in voter turnout in the country, compared to last year’s average turnout of 69%

    पहिल्या टप्प्यातील १०२ पैकी ७३ जागा सर्वसाधारण, ११ एसटी, १८ एससीसाठी राखीव होत्या.

    कुठे किती मतदान?

    बिहार 46.32%

    राजस्थान 50.27%

    मिझोराम 52.62%

    बंगाल, त्रिपुरा, पुडुचेरी, आसाममध्ये 70% मतदान.

    म.प्र. आणि छत्तीसगडसह 8 राज्यांमध्ये 60 ते 70% दरम्यान मतदान

    यूपी व उत्तराखंडसह 8 राज्यांत 50-60% दरम्यान.

    पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या 5 जागांवर शुक्रवारी शांततेत मतदान झाले. विदर्भात तापमान 42 अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे मतदान घटल्याचे सांगितले जाते. 2019 मध्ये सरासरी 64.85% मतदान झाले होते तर यंदा 60.22% पर्यंत घटले. या पाचपैकी 3 जागांवर भाजप, तर प्रत्येकी एका जागेवर शिंदेसेना व काँग्रेसचे खासदार आहेत. मतदान घटल्याने भाजपच्या काळजीत मात्र भर पडली आहे.

    दुसरा टप्पा 26 एप्रिलला

    पुढच्या टप्प्यात 13 राज्यांतील 89 जागांवर 26 एप्रिलला मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांचा समावेश आहे.

    5% lower turnout than 2019 in Vidarbha; 8% decline in voter turnout in the country, compared to last year’s average turnout of 69%

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!