बंगळुरु : भारताच्या चांद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून जागतिक इतिहास रचला. अमेरिका, रशिया आणि चीन या विकसित देशांवर भारतीय वैज्ञानिकांनी मात करून दाखवली. अमेरिकन नासा, युरोपियन स्पेस एजन्सीच्या नजरा भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या यशापयशावर खिळल्या होत्या. त्या मोहिमेत भारताला आज प्रचंड यश मिळाले. भारताचा तिरंगा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फडकला.5 great scientist of Isro who made the moon mission Chandrayaan 3 successful!!
पण ही कामगिरी करणे सोपे नव्हते. या कामगिरीत यशापयशाचे खाचखळगे होते. पण या सगळ्या खाचखळग्यांवर मात करून चांद्रयान 3 मोहीम यशस्वी करण्यामध्ये भारतीय अंतराळ संशोधन विकास संस्था “इस्रो”च्या 5 वैज्ञानिकांचा सिंहाचा वाटा राहिला भारताचा चांद्रयान मोहिमेचे हे 5 सेनापती आहेत. जगभरातले करोडो भारतीय त्यांना मानाचा मुजरा करत आहेत.
इस्रो प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या टीमने आज हे यश मिळविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करताना, “आपका नाम सोमनाथ और मिशन भी सोम से मतलब चंद्रमा से जुडा हुआ. आपने वह यशस्वी किया,” असे उद्गार काढले.
चांद्रयान 3 च्या प्रत्यक्ष तयारीसाठी 3 वर्ष 9 महिने 14 दिवस लागले.
डॉ. एस. सोमनाथ :
चांद्रयान 3 मध्ये वापरलेले बाहुबली रॉकेट डिजाइन केले आहे. डॉ. एस सोमनाथ इस्रोचे अध्यक्ष आहेत. त्यांनी फोर फ्रंट वर राहून या मोहिमेचे नेतृत्व केले. इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स बंगळुरुमध्ये शिक्षण घेतलेल्या डॉ. एस सोमनाथ यांना मागच्यावर्षी जानेवारीमध्ये जबाबदारी मिळाली होती. चांद्रयान 3 नंतर डॉ. एस सोमनाथ यांच्याकडे दोन मिशन्सची जबाबदारी आहे. यात आदित्य एल 1 आणि गगनयान मिशन आहे.
पी. वीरमुथुवेल
पी. वीरमुथुवेल या मिशनचे प्रोजेक्टर डायरेक्टर आहेत. 2019 मध्ये त्यांना मिशनची जबाबदारी मिळाली. पी वीरमुथुवेल याआधी इस्रोच्या हेड ऑफिसमध्ये स्पेस इन्फ्रास्ट्रक्चर प्रोग्रामचे उपसंचालक होते. इस्रोच्या दुसऱ्या चंद्र मोहिमेतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी निभावली होती.
तामिळनाडूच्या के विल्लुपुरममध्ये राहणाऱ्या पी वीरामुथुवेल यांनी IIT मद्रासमधून ग्रॅज्युएशन केलं आहे. पी. वीरामुथुवेल वीरा नावाने सुद्धा ओळखले जातात.
एस उन्नीकृष्णन नायर
विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे डायेरक्टर आणि एयरोस्पेस इंजीनियर डॉ. उन्नीकृष्णन यांच्याकडे चांद्रयान 3 मिशनशी संबंधित अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली केरळ येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्राने जियोसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हीकल (जीएसएलवी) मार्क-III तयार केलं. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्समधून शिकणाऱ्या डॉ. उन्नीकृष्णन यांनी चांद्रयान-2 च्या अपयशामधून धडे घेतले. त्यातल्या कमतरता समजून घेतल्या आणि मिशन यशस्वी करण्यासाठी पुन्हा रणनीती बनवली.
एम शंकरन
एम. शंकरन यू आर राव सॅटेलाइट सेंटरचे डायरेक्टर आहेत. या संस्थेकडे इस्रोचे उपग्रह तयार करण्याची जबाबदारी आहे. शंकरन यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिकेशन, नेविगेशन, रिमोट वर्किंग, हवामानाची भविष्यवाणी आणि ग्रहांचा शोध घेण्याची जबाबदारी आहे.
एम शंकरन यांनी 1986 साली भारतीदासन विश्वविद्यालय, तिरुचिरापल्ली येथून फिजिक्समध्ये मास्टर डिग्री मिळवली. त्यानंतर ते इस्रोच्या URSC सेंटरशी जोडले गेले.
डॉ. के. कल्पना
डॉ. के. कल्पना चंद्रयान-3 मिशनमध्ये डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर आहे. दीर्घकाळापासून त्या मून मिशनमध्ये काम करत आहेत. कोविड काळातही त्यांनी मिशनवर काम सुरु ठेवले होते. त्या या प्रोजेक्टवर 4 वर्षापासून काम करत आहेत. डॉ. के. कल्पना सध्या URSC च्या डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत.
5 great scientist of Isro who made the moon mission Chandrayaan 3 successful!!
महत्वाच्या बातम्या
- निष्ठावंत नेत्यांना 75 व्या वर्षी निवृत्त करणारे भाजपचे बॉस पवारांना 83 व्या वर्षी कुठली ऑफर देतील??
- ‘CBI’ने राहुल गांगल यास केली अटक! भारतीय संरक्षणाची गोपनीय कागदपत्रे इतर देशांना पुरवल्याचा आरोप
- 2023 चा नौसेना दिवस छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित; सिंधुदुर्गावर भव्य आयोजन!!
- चांद्रयान-3च्या लँडिंग दरम्यान पंतप्रधान मोदी व्हर्चुअली ‘इस्रो’शी जुडणार!