Rahul Gandhi Punjab tour : राहुल गांधींच्या पंजाब दौऱ्यातही काँग्रेस दुभंगलेली दिसली. काँग्रेसच्या 5 खासदारांनी राहुल यांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकला. यामध्ये मनीष तिवारी, रवनीत बिट्टू, जसबीर डिम्पा, मोहम्मद सिद्दीकी आणि परनीत कौर यांचा समावेश आहे. परनीत कौर या राज्याचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पंजाब लोक काँग्रेस नावाचा नवा पक्ष स्थापन केला असून ते भाजपसोबत युती करून निवडणूक लढवत आहेत. 5 Congress MPs including Manish Tiwari absent in Rahul Gandhi Punjab tour
वृत्तसंस्था
चंदिगड : राहुल गांधींच्या पंजाब दौऱ्यातही काँग्रेस दुभंगलेली दिसली. काँग्रेसच्या 5 खासदारांनी राहुल यांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकला. यामध्ये मनीष तिवारी, रवनीत बिट्टू, जसबीर डिम्पा, मोहम्मद सिद्दीकी आणि परनीत कौर यांचा समावेश आहे. परनीत कौर या राज्याचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पंजाब लोक काँग्रेस नावाचा नवा पक्ष स्थापन केला असून ते भाजपसोबत युती करून निवडणूक लढवत आहेत.
मात्र, काँग्रेसने खासदारांच्या बहिष्काराचे वृत्त फेटाळून लावले आहे. पक्षाचे खासदार जसबीर सिंग गिल यांनी ट्विट केले की, या कार्यक्रमासाठी केवळ 117 काँग्रेस उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले होते. खासदारांना निमंत्रण नव्हते. त्यामुळे बहिष्कार टाकण्यासारखे काही नाही. याआधी एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की, वैयक्तिक कामामुळे मी अमृतसरमधील कार्यक्रमाला पोहोचू शकलो नाही. यासंदर्भात मी नेतृत्वाला कळवले आहे. कृपया कोणताही अंदाज लावू नका.
राहुल गांधींचे मिशन पंजाब आजपासून सुरू झाले आहे. राहुल आज एका विशेष विमानाने अमृतसरला पोहोचले, जिथे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी आणि पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिद्धू या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर राहुल श्री दरबार साहिब येथे पोहोचले, तेथे त्यांनी काँग्रेस उमेदवारांसोबत डोके टेकवून लंगर घेतले. यानंतर ते जालियनवाला बाग पाहण्यासाठी गेले. येथे त्यांनी शहिदांना आदरांजली वाहिली. राहुल यांनी श्री दुर्ग्याना मंदिर आणि भगवान वाल्मिकी तीर्थ येथे जाऊन त्यांना आदरांजली वाहिली.
‘पंजाब फतेह’च्या नावाने राहुल गांधी व्हर्च्युअल रॅली
मिठापूर, जालंधरमध्ये दुपारी 3.30 ते 4.30 या वेळेत राहुल यांच्या ‘पंजाब फतेह’ नावाने आभासी रॅलीला संबोधित करण्याचा कार्यक्रम आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने महिन्याच्या सुरुवातीला फीजिकल रॅलींवर बंदी घातल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिला पंजाब दौरा आहे. विशेष म्हणजे पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केल्यानंतर अनेक दावेदारांनी तिकीट न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये माजी मंत्री जगमोहन सिंग कांग, दमन बाजवा, सतविंदर बिट्टी आणि विद्यमान आमदार अमर सिंह धिल्लन यांचा समावेश आहे. खरारमधून पक्षाचे तिकीट मागत असलेले जगमोहन सिंग कांग यांनी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचा आरोप केला. चन्नी यांनीच दारू ठेकेदार विजय शर्माला पाठिंबा दिल्याचा दावा कंग यांनी केला आहे.
5 Congress MPs including Manish Tiwari absent in Rahul Gandhi Punjab tour
महत्त्वाच्या बातम्या
- प्रजासत्ताक दिनी दिल्लीत तरुणीवर सामूहिक बलात्कार, महिलांनीच पीडितेचे केस कापले, गळ्यात चपलाची माळ टाकून तोंडाला फासले काळे
- श्वेता तिवारी म्हणाली, माझ्या ब्रा ची साईज देवच मोजत आहे, मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
- महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जबरदस्त धक्का, मालेगावच्या नगराध्यक्षांसह 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
- नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला; दहा दिवसात शरण येण्याचे आदेश