• Download App
    बंगाल निकालानंतर 24 तासांत हिंसाचाराचे 5 भाजप कार्यकर्त्यांचा बळी, राज्यपालांनी डीजीपींना बोलावले । 5 BJP workers killed in violence In 24 hours after Bengal Election Results, governor called DGP

    बंगाल निकालानंतर २४ तासांत हिंसाचारात ५ भाजप कार्यकर्त्यांचा बळी, राज्यपालांनी डीजीपींना बोलावले

    5 BJP workers killed in violence : तृणमूल कॉंग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालमध्ये सत्ता परत आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला आहे. निवडणुकीच्या निकालाच्या 24 तासांतच 5 भाजप कार्यकर्त्यांचा बळी गेला आहे. याशिवाय डझनभर भाजप समर्थकांच्या घरांची तोडफोड करण्यात आली असून पक्षाच्या कार्यालयाला ठिकठिकाणी आग लावण्याची घटना घडली आहे. निवडणुकीदरम्यान एकाची सितलकुची येथे गोळ्या घालून ठार हत्या करण्यात आली. या सर्व हिंसाचारासाठी भाजपने टीएमसीवर आरोप केले आहेत. 5 BJP workers killed in violence In 24 hours after Bengal Election Results, governor called DGP


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : तृणमूल कॉंग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालमध्ये सत्ता परत आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला आहे. निवडणुकीच्या निकालाच्या 24 तासांतच 5 भाजप कार्यकर्त्यांचा बळी गेला आहे. याशिवाय डझनभर भाजप समर्थकांच्या घरांची तोडफोड करण्यात आली असून पक्षाच्या कार्यालयाला ठिकठिकाणी आग लावण्याची घटना घडली आहे. निवडणुकीदरम्यान एकाची सितलकुची येथे गोळ्या घालून ठार हत्या करण्यात आली. या सर्व हिंसाचारासाठी भाजपने टीएमसीवर आरोप केले आहेत.

    वाढलेल्या हिंसक घटनांवर राज्यपाल जगदीप धनखड यांनी ट्विट करून चिंता व्यक्त केली असून परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले. यावर त्वरित कारवाई करण्याची गरज आहे. राज्यपालांनी ट्वीट केले की, “राज्यातील विविध भागांतून होणाऱ्या हिंसाचार, जाळपोळ आणि हत्येच्या बर्‍याच वृत्तांनी चिंतेत आहे. पक्ष कार्यालये, घरे आणि दुकानांवर हल्ले होत आहेत. परिस्थिती चिंताजनक आहे.” कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी डीजीपीला बोलावले आहे. राज्यपालांनी ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली.

    सोनारपूरमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या

    दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील सोनारपुरात तृणमूलने भाजप कार्यकर्त्याला जिवे मारल्याचा आरोप आहे. मृत भाजप कार्यकर्त्याचे नाव हरण अधिकारी असे सांगितले जात आहे. ते सोनारपूर दक्षिण येथील प्रतापनगर भागातील रहिवासी होते. याचबरोबर कोलकात्यात तृणमूलने कंकुरागाची येथील भाजप कार्यकर्त्याचीही हत्या केल्याचा आरोप आहे. अभिजित सरकार असे मृत भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे.

    5 BJP workers killed in violence In 24 hours after Bengal Election Results, governor Dhankhad called DGP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला