वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फीकार आली भुट्टो गेले जीवानिशी, 44 वर्षानंतर पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने चुकीची ठरवली फाशी!!, असे काल घडले जुल्फीकार भुट्टो यांना अन्याय्य पद्धतीने खटला चालवून पाकिस्तानातल्या लष्करी राजवटीने फाशी देऊन मारले, असा ठपका पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाच्या नऊ न्यायाधीशांच्या सुप्रीम कोर्टाने जनरल झिया उल हक यांच्या लष्करी राजवटीवर ठेवला. 44 years after Zulfiqar Ali Bhutto’s death, Pakistan’s Supreme Court ruled the execution wrong.
जुल्फीकार अली भुट्टो यांचे जावई आणि बेनझीर भुट्टो यांचे पती पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी 10 वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात हा खटला दाखल केला होता. जुल्फीकार अली भुट्टो यांच्यावर खोटे आरोप लादून खोटा खटला चालवून त्यांना फाशी दिल्याचा दावा असिफ अली झरदारी यांनी केला होता. तो दावा पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने मान्य केला.
जुल्फिकार अली भुट्टो यांच्यावर अन्याय्य पद्धतीने खटला चालवला. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची पुरेशी संधी पाकिस्तानच्या लष्करी राजवटीने उपलब्ध करून दिले नव्हती. त्यांच्यावर खुनाचा खटला चालविला. परंतु, प्रत्यक्षात न्यायाचाच खून झाला, असे परखड ताशेरे पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने त्यावेळच्या जनरल झिया उल हक यांच्या लष्करी राजवटीवर मारले.
पण हे सगळे जुल्फीकार अली भुट्टो यांच्या फाशीनंतर यांना दिलेल्या फाशीनंतर तब्बल 44 वर्षांनी घडले. दरम्यानच्या काळात त्यांच्या कन्या बेनझीर भुट्टो यांची देखील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हत्या झाली. आता त्यांचा नातू बिलावल भुट्टो सत्ताधारी आघाडीत आहे.