वृत्तसंस्था
बर्लिन – संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या मुदतीत हरीतगृह वायू उत्सर्जनात घट करण्यासाठीचा सुधारित आराखडा सादर करण्यात भारत आणि चीनला अपयश आले आहे. 43 countries ignored towards UN
संयुक्त राष्ट्रांच्या ११० सदस्य देशांनी त्यांची नवी उद्दीष्ट्ये सादर केली असली तरी अद्याप ४२ टक्के देशांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याची खंत संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विभागाच्या प्रमुख पॅट्रिशिया एस्पिनोसा यांनी व्यक्त केली. नोव्हेंबर महिन्यात जागतिक पर्यावरण परिषद होणार आहे.
तापमान वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्व देशांनी सुधारित उद्दीष्ट्ये निश्चिकत करून त्याबाबतचा आराखडा ३१ जुलैपर्यंत सादर करावा, अशी सूचना संयुक्त राष्ट्रांनी सर्व देशांना केली होती. मात्र, भारत आणि चीनसह अनेक देशांना ही वेळ पाळता आलेली नाही. सर्वाधिक प्रमाणात हरितगृह वायूंचे उत्सर्जन करणाऱ्या देशांच्या यादीत चीन प्रथम क्रमांकावर असून अमेरिका दुसऱ्या, तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेने त्यांचा सुधारित आराखडा एप्रिलमध्येच सादर केला आहे.
43 countries ignored towards UN
महत्त्वाच्या बातम्या
- हिमाचल : श्रावण अष्टमी यात्रेत बाहेरून येणाऱ्यांची कोविड नकारात्मक अहवाल किंवा लस प्रमाणपत्र गरजेचे
- देशातील बेरोजगारी, भ्रष्टाचाराला काँग्रेस जबाबदार, मुख्यमंत्री रुपानी यांचा आरोप
- बॉर्डर बटालियनचे मुख्यालय भारत-पाकिस्तान सीमेजवळ, 120 कॅनल्स जमीन देण्यात आली
- केंद्र सरकारपुढे अखेर ट्विटर नमले, नव्या माहिती तंत्रज्ञान नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय
- ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहात चीनला हस्तक्षेप करू देता कामा नये, संसदीय समितीची केंद्राला सूचना