• Download App
    भारत जोडो यात्रेत राहुलजींच्या पत्रकार परिषदेपेक्षा 41000 च्या Burberry टी-शर्टची चर्चा!! 41000 Burberry t-shirt discussion than Rahulji's press conference in Bharat Jodo Yatra

    भारत जोडो यात्रेत राहुलजींच्या पत्रकार परिषदेपेक्षा 41000 च्या Burberry टी-शर्टची चर्चा!!

    विनायक ढेरे

    नाशिक : काँग्रेसच्या राजकीय महत्त्वाकांक्षी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी सध्या तामिळनाडूमध्ये आहेत. त्यांची रोजची यात्रा सुरू आहे. आजच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का नाही?, हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळीच स्पष्ट होईल, असे म्हटले आहे. परंतु देशाच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगण्यापेक्षा त्यांनी पत्रकार परिषद आणि प्रत्यक्ष भारत जोडो यात्रेत परिधान केलेल्या Burberry टी-शर्टचीच जास्त चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 41000 Burberry t-shirt discussion than Rahulji’s press conference in Bharat Jodo Yatra

    राहुलजींचे फॅशन स्टेटमेंट

    राहुलजींनी आपल्या अंगावर तब्बल 41 हजार रुपयांचा Burberry कंपनीचा टी-शर्ट घातल्याची ही चर्चा आहे. राहुलजी नेहमी कॅज्युअल वेअर मध्येच असतात. त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला जीन्स वर पांढरा झब्बा अशी फॅशन त्यांनी रूढ केली होती. त्यानंतर ते अनेकदा त्या पोशाखात दिसले. परंतु नंतरच्या काळात पायजमा आणि झब्बा आणि हाफ जर्किन अशाही वेशात ते काही वेळा दिसले. सध्या भारत जोडो यात्रेमध्ये ते सहभागी झाले आहेत आणि त्यांनी Burberry कंपनीचा 41 हजार रुपयांचा टी-शर्ट घातल्याची चर्चा आहे.

    मल्टिनॅशनल कंपनी, महाग कपडे

    ही ती Burberry कंपनी आहे, जी लंडनमध्ये 1856 मध्ये स्थापन झाली. तिच्या जगभर शाखा आहेत. फॅशन वेअर मध्ये ती आघाडीची मल्टिनॅशनल कंपनी मानली जाते. परंतु तिचे त्या कंपनीच्या मेकचे कपडे महाग मानले जातात. राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा करत आहेत. या यात्रेत त्यांनी देशी खादीचा झब्बा, पायजमा अथवा कोणताही देशी पोशाख न करता Burberry मल्टिनॅशनल कंपनीचा टी-शर्ट परिधान केल्याने त्यांच्यावर सोशल मीडियातून अनेक जण शरसंधान साधत आहेत.

    41000 Burberry t-shirt discussion than Rahulji’s press conference in Bharat Jodo Yatra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते

    Lawyer Rakesh Kishor Kumar : CJI वर बूट फेकणाऱ्या वकिलाने म्हटले- घडले त्याबद्दल पश्चात्ताप नाही; नशेत नव्हतो, सरन्यायाधीशांच्या देवाबद्दलच्या विधानाने वाईट वाटले