वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीतल्या दारू घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी कडून आलेले तिसरे समन्स देखील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फेटाळून लावले. त्यामुळे ईडी आता थेट कोर्टाचा दरवाजा ठोठावून कठोर कायदेशीर कारवाईच्या मर्यादेपर्यंत आली आहे. या पार्श्वभूमीवर INDI आघाडीतले नेते आम आदमी पार्टीवर जोरदार चढाई करत आहेत.40% of Aam Aadmi Party leaders in Tihar, rest on the way to jail says sandeep dixit
अरविंद केजरीवाल यांनी ईडी चौकशीला सामोरे गेले पाहिजे. जर ते निर्दोष असतील, तर ते सुटतील, नाहीतर अडकतील. पण देशात अशी कोणती पार्टी आहे, ज्याचे 40% नेते तिहार मध्ये सापडतात आणि उरलेले तिहार जेलच्या वाटेवर आहेत, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते खास माजी खासदार संदीप दीक्षित यांनी आज आम आदमी पार्टीचे वाभाडे काढले. त्यामुळेINDIA आघाडीत दो फाड झाले!!
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्लीतल्या काँग्रेसवर आम आदमी पार्टीला साथ न देण्याची तक्रार आणि टीका केली होती. त्या मुद्द्यावरून संदीप दीक्षित यांनी आम आदमी पार्टीला खडे बोल सुनावले. आम आदमी पार्टी अतिशय छोटी आहे, पण काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी त्यांना INDI आघडीत घ्यायला सांगितले म्हणून आम्ही त्यांचे स्वागत केले, पण आम आदमी पार्टीच्या नेत्यांना कुठल्याही मोठ्या आघाडीत जाऊन काम करण्याची सवय नाही.
त्यांना केवळ दुसऱ्यांकडे बोटे दाखवण्याची सवय आहे. त्यांच्यात एवढी राजकीय प्रगल्भता आणि भान निर्माणच झालेले नाही. मोठ्या आघाडीत काम करताना आपल्याला संयम राखावा लागतो. बयानबाजी करताना अनावश्यक बडबड करून आघाडीत काम करता येत नाही, हे आम आदमी पार्टीच्या नेत्यांना समजत नाही. या पार्टीचे 40 % नेते तिहार मध्ये तुरुंगाची हवा खात आहेत आणि उरलेले नेते तिहार जेलच्या वाटेवर आहेत, अशी घणाघाती टीका संदीप दीक्षित यांनी केली. त्यामुळे INDI आघाडीत जागावाटपाच्या बैठकीपूर्वीच फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले.
काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या 2 पक्षांमध्ये दिल्ली आणि पंजाब मध्येच जागा वाटपाची शक्यता आहे. कारण या दोनच राज्यांमध्ये आम आदमी पार्टी सत्तेवर आणि काँग्रेस विरोधात आहे. बाकीच्या राज्यांमध्ये आम आदमी पार्टीचे फारसे अस्तित्वच नाही की, ज्यामुळे काँग्रेसने आम आदमी पार्टीला आपल्या वाट्याच्या जागा द्याव्यात. पण आता पंजाब आणि दिल्ली या दोन राज्यांमधल्याच नेत्यांमध्ये भांडण जुंपल्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये INDI आघाडीत दो फाड झाले आहेत.
40% of Aam Aadmi Party leaders in Tihar, rest on the way to jail says sandeep dixit
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : हिट अँड रनचा वाद काय? भारतातल्या कायद्याला विरोध का? परदेशात कोणते कायदे? वाचा सविस्तर
- ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा नवा नारा!
- ‘हिट अँड रन’ कायद्याची सध्या अंमलबजावणी होणार नाही, संप मागे घेण्याचे आवाहन!
- मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हेक्षणाचे काम बिनचूक आणि कालबद्धरितीने व्हावे