विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : कोरोना संसर्गामुळे जगभरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४० लाखांच्या वर गेली आहे. जवळपास प्रत्येक देशात नोंद झालेल्या मृत्युसंख्येपेक्षाही प्रत्यक्षातील मृत्युसंख्या अधिक असल्याचा दावा केला जात आहे. 40 lack people died due to corona
गेल्या काही दिवसांमध्ये डेल्टा हा कोरोना विषाणूचा उत्परिवर्तित प्रकार सर्वत्र वेगाने पसरत आहे. अमेरिका, भारत, ब्रिटन, इस्राईल या देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढते आहे. ब्रिटनमध्ये कोरोना निर्बंध हटविण्याची तयारी सुरु असतानाच जानेवारीपासून प्रथमच एकाच दिवशी ३० हजार नवे रुग्ण आढळले आहेत. अनेक देशांनी पुन्हा निर्बंध कडक करण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे ६,२१,९०४ बळी गेले असून त्याखालोखाल ब्राझील ( ५,२८,६११) आणि भारतात (४,०५,०५७) बळी गले आहेत.
सध्या अनेक देशांमध्ये लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. त्याचा परिणाम म्हणून दररोज मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जानेवारीतील १८ हजारांवरून आता ७९०० पर्यंत खाली आली आहे.
40 lack people died due to corona
महत्त्वाच्या बातम्या
- कायदेभंग केला असेल, तर ट्विटरवर कारवाईचा केंद्र सरकारला पूर्ण अधिकार; दिल्ली हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
- मंत्री बनताच सिंधियांचे फेसबुक अकाउंट हॅक, जुने मोदी सरकारविरोधी व्हिडिओ अपलोड, पुन्हा रिकव्हरही झाले
- उत्तीर्ण मराठी तरुणांना रेल्वेमध्ये रुजू करून घ्या ; नांदगांवकर
- पदभार स्वीकारताच नवे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांचा ट्विटरला इशारा, म्हणाले – देशातील कायद्यांचे पालन करावेच लागेल
- फीच्या तक्रारी संदर्भात आमचा पाठपुरावा ; वर्षा गायकवाड