• Download App
    युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणायच्या मिशन गंगावर मोदी सरकारचे 4 मंत्री!! 4 ministers of Modi government on mission Ganga to bring Indian students trapped

    Ukraine Indian students : युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणायच्या मिशन गंगावर मोदी सरकारचे 4 मंत्री!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत मायदेशात आणण्याच्या मिशनवर मोदी सरकार मधील 4 मंत्री त्यांच्या शेजारच्या देशांमध्ये दौरा करणार आहेत.
    4 ministers of Modi government on mission Ganga to bring Indian students trapped

    पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि जनरल व्ही. के. सिंग हे मंत्री शेजारच्या देशात जाऊन भारतीय विद्यार्थ्यांना परत भारतात आणण्याच्या मिशन गंगाला वेग देणार आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया – युक्रेन वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची महत्वाची बैठक आज घेतली. त्यामध्ये 4 केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारच्या देशात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. युक्रेनमध्ये सुमारे 20000 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेतात. हे सगळे युक्रेनची राजधानी कीव्ह आणि परिसरामध्ये अडकले आहेत.

    रस्ते मार्गाने ते शेजारच्या युरोपीय देशात पोहोचतील आणि त्यांना तेथून हवाई मार्गाने भारतात आणण्याचे मिशन गंगा सुरू झाले आहे. त्याला विचार केंद्रीय मंत्री वेग देण्याचे काम करतील, अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिली आहे.

    4 ministers of Modi government on mission Ganga to bring Indian students trapped

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    yogi adityanath : मणिकर्णिका वादावर योगी म्हणाले- काशीला बदनाम करण्याचा कट; AI व्हिडिओमुळे काँग्रेसने दिशाभूल केली, त्यामुळे मला यावे लागले

    Sambit Patra : भाजपने म्हटले-₹10 हजारात बांगलादेशी-रोहिंग्यांना नागरिकत्व देत आहेत ममता, म्हणूनच ईडीच्या धाडीने घाबरल्या

    Modi : मोदी म्हणाले- TMC घुसखोरांना मतदार बनवत आहे; यांना वसवून गरिबांचा हक्क हिरावला जात आहे, भाजप यांना देशाबाहेर काढेल