विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या यादीतून भाजपने कर्नाटक, उत्तराखंड, हरियाणा ही राज्ये “मोकळी” करत त्या राज्यांचे माजी मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना भाजपने आधीच विदिशा मधून लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. 4 former Chief ministers of BJP to contest loksabha election
त्या पाठोपाठ आज दुसऱ्या उमेदवार यादीत हरियाणाच्या कर्नाल मधून माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना हावेरी मतदारसंघातून, तर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना हरिद्वार मतदार संघातून लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. या यादीच्या निमित्ताने भाजपने मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा आणि उत्तराखंड ही राज्ये आता पक्षातल्या नव्या पिढीसाठी खऱ्या अर्थाने “मोकळी” करून दिली आहेत.
कर्नाटकच्या म्हैसूर मधून संस्थानिक यदुवीर कृष्णराज वडियार यांना भाजपने तिकीट दिले आहे. त्यांचे पिताजी २००९ मध्ये म्हैसूर मधूनच काँग्रेसचे उमेदवार होते.
दादरा नगर हवेलीतून भाजपने श्रीमती कलाबेन डेलकर यांना तिकीट दिले असून त्या आधी शिवसेनेच्या खासदार होत्या. त्यांच्या पतीने आत्महत्या केल्यानंतर तिथे पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी भाजपने त्यांना तिकीट दिले नव्हते, तर उद्धव ठाकरे यांनी आयत्या वेळेला त्यांना शिवसेनेचे तिकीट देऊन डेलकरांचाच प्रभाव वापरून लोकसभेत शिवसेनेचा एक खासदार वाढवला होता. पण कलाबेन डेलकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना आता भाजपने 2024 चे लोकसभेचे तिकीट दिले आहे.
4 former Chief ministers of BJP to contest loksabha election
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारने JKNFवर पाच वर्षांसाठी बंदी घातली; जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळे करण्याचा होता कट
- रेल्वेच्या एकता मॉल प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- हवाई दलाचे लढाऊ विमान तेजस जैसलमेरमध्ये कोसळले
- काँग्रेसने मध्यप्रदेश-राजस्थानसह सहा राज्यांतील ४३ उमेदवारांची यादी केली जाहीर