Tuesday, 6 May 2025
  • Download App
    संजय राऊतांच्या नावाचा वापर करून सुजित पाटकरांना 33 कोटीचे कोविड टेंडर; ईडीच्या आरोपपत्रात ठळक उल्लेख|33 crore Covid tender to Sujit Patkar using Sanjay Raut's name; A prominent mention in the ED charge sheet

    संजय राऊतांच्या नावाचा वापर करून सुजित पाटकरांना 33 कोटीचे कोविड टेंडर; ईडीच्या आरोपपत्रात ठळक उल्लेख

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  मुंबईतील कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात  ED ने एक महत्त्वाचा खुलासा केला असून त्यात संजय राऊत यांच्या नावाचा वापर करून सुजित पाठकरांना 33 कोटी रुपयांचे पेंटर मंजूर झाले, असे नमूद केले आहे.33 crore Covid tender to Sujit Patkar using Sanjay Raut’s name; A prominent mention in the ED charge sheet

    सुजित पाटकरने महामारीच्या काळात अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना भेटण्यासाठी त्याचा मित्र आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची ओळख वापरल्याचे ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. वरळी आणि दहिसर कोविड जंबो रुग्णालयाच्या निविदा चर्चेसाठी सुजित पाटकरने संजीव जयस्वाल यांची भेट घेतली होती.



    सुजित पाटकर यांनी कंपनी स्थापन करण्यापूर्वी लाइफलाइन हॉस्पिटलचे लेटरहेड संजीव जयस्वाल यांना देण्यास वापरले. पाटकर यांनी संजय राऊत यांच्या नावाचा वापर करून टेंडर मिळवले, यासाठी संजीव जयस्वाल यांनी सुजित पाटकरांना मदत केली. पाटकर आपल्या राजकीय संपर्काचा वापर करून निविदा प्रक्रियेची पूर्वमाहिती मिळवत होता. पाटकर कंपनीने 60 % कमी कर्मचारी पुरवले होते, तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्याशी तडजोड करून जास्तीचे बिले बीएमसीला पाठवली होती.

    एवढेच नाही तर कोरोना बाधित रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या  कोविड 19 उपचार केंद्राला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला होता. या चक्रीवादळावेळी केंद्रातील सर्व रुग्णांना एका दिवसासाठी इतर रुग्णालयात हलवले होते त्या दिवशीची बिले देखील पाठवली. डॉ.किशोर बिसुरे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे हा मुद्दा मांडूनही कारवाई झाली नाही.  केवळ 31 लाखांचा दंड ठोठाविण्यात आला.

    संजय राऊतच्या नावाचा वापर करून 32 कोटी 60 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट मिळवले. या कॉन्ट्रॅक्टविषयी संजय राऊतांना माहित होते. वर्षा संजय राऊत, सपना सुजित पाटकर यांच्या नावाने पत्राचाळ घोटाळ्याच्या पैशातून अलिबाग येथे जमीनही घेण्यात आली होती. याच लोकांना खिचडीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाले त्यातले पैसे संजय राऊतांची मुलगी आणि भावाच्या खात्यात गेल्याची माहिती भाजपनेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

    ईडीचा दावा काय?

    सुजित पाटकर हे संजय राऊतांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना राजकीय नेतांच्या प्रभावामुळे कोविड सेंटरचे काम मिळाल्याचा दावा ईडीकडून करण्यात येत होता. तसेच, याबद्दल स्वत: सुजित पाटकर यांनी खुलासा केला असल्याचा दावा देखील ईडीने केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. तर या लाईफलाईन रुग्णालयांमध्ये कोविड कालावधीत अनेक आर्थिक घोटाळे झाले असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या प्रकरणात अनेक गैरव्यवहार झाल्याचं देखील समोर आलं आहे. त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखेला या प्रकरणात आणखी कोणती माहिती सापडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    33 crore Covid tender to Sujit Patkar using Sanjay Raut’s name; A prominent mention in the ED charge sheet

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Multi-Influence Land : नौदलाकडून मल्टीइन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची यशस्वी चाचणी; समुद्रात शत्रूच्या जहाजांना लक्ष्य करेल

    India-Pakistan War : महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक सह 16 जिल्ह्यांमध्ये उद्या Mock drill

    महाराष्ट्रातल्या महापालिका + जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; पुढच्या 4 महिन्यांमध्ये निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश!!