प्रतिनिधी
नवी दिल्ली : एक – दोन, दहा पंधरा नव्हे, तर तब्बल 32000 मुलींचे इस्लाम मध्ये धर्मांतर करून त्यांची येमेन आणि सीरियात दहशतवादी गुलाम म्हणून विक्री झाली आहे. ही सत्य घटना केरळमध्ये घडली आहे आणि या घटनेवर आधारित द केरळ स्टोरी सिनेमा येतो आहे. 32000 girls converted to Islam and sold as terrorist slaves in Yemen Syria
“द काश्मीर फाइल्स” या सिनेमातून काश्मीर मधल्या हिंदू नरसंहाराचे भयानक सत्य जगासमोर आले. तसेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक भयानक सत्य केरळमधून बाहेर येत आहे. “द केरळ स्टोरी” या सिनेमाची ही खरी स्टोरी आहे.
केरळमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात मोपला अत्याचार झाले. लाखो हिंदूंची धर्मांतरे, हत्या झाल्या आणि आजही धर्मांतरी सुरू आहेत. हे भयानक वास्तव “द केरळ स्टोरी” या सिनेमातून मांडले आहे. या सिनेमाचा टिझर आउट झाला आहे आणि या टीझरमध्येच पूर्वाश्रमीची हिंदू मुलगी शालिनी उन्नीकृष्णन आपली आपबीती सांगते आहे. आता ती फातिमा बा आहे. शालिनी उन्नीकृष्णनची फातिमा बा कशी झाली एवढ्या पुरतीच ही स्टोरी मर्यादित नसून एक दोन नव्हे, पाच दहा नव्हे तर तब्बल 32000 मुलींचे इस्लाम मध्ये धर्मांतर आणि येमेन – सीरियामध्ये दहशतवादी गुलाम म्हणून विक्री हे सत्य कथन ती करताना दिसते. 2009 मध्ये 32000 हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे इस्लाम मध्ये धर्मांतर केले गेले. मी शालिनी उन्नीकृष्णन. मला नर्स बनवून मानवतेची सेवा करायची होती पण आता आम्ही फातिमा बा आहे आणि सध्या अफगाणिस्तानच्या जेलमध्ये बंद आहे, हे सत्य कथन तिने केले आहे.
इतकेच नव्हे तर नुकतीच बंदी घातलेली संघटना “द पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया” हिच्या घातक मनसुब्यांविषयी केरळचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतनंदन हे देखील बोलताना दिसतात. पीएफआय संघटनेला केरळ हे 20 वर्षांमध्ये मुस्लिम राज्य बनवायचे आहे, असे ते म्हणाल्याचे टीझर मधून दिसते.
“द केरळ स्टोरी” या सिनेमाची निर्मिती विपुल अमृता शाह यांनी केली असून सुदीप्तो सेन यांनी दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणे अपेक्षित आहे.
32000 girls converted to Islam and sold as terrorist slaves in Yemen Syria
महत्वाच्या बातम्या
- वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प शिंदे – फडणवीस सरकारच्या नव्हे, तर महाविकास आघाडीच्याच काळात गेला; माहिती अधिकारातून खुलासा
- लिबरल्सना राहुल गांधींच्या नेतृत्वाचे आकर्षण; बॉलिवूड पासून दूर पूजा भट्ट भारत जोडो यात्रेत सामील
- दहशतवादाला बळी पडलेल्यांच्या वारसांसाठी मेडिकलच्या जागा राखीव; केंद्र सरकारचा निर्णय
- सरकारी नोकरीची संधी; IBPS अंतर्गत बंपर भरती; करा अर्ज