विशेष प्रतिनिधी
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या पुजारी पदासाठी 3000 उमेदवारांनी अर्ज केले. यापैकी 200 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. मकर संक्रांतीनंतर रामलल्ला 22 जानेवारी 2024 ला रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. 3000 applications for the post of priest in Ram temple
राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी सोमवारी सांगितले की, 200 उमेदवारांची त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे मुलाखतीसाठी निवड करण्यात आली आहे. ट्रस्टने या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले आहे. अयोध्येतील विश्व हिंदू परिषदेचे मुख्यालय असलेल्या कारसेवक पुरम येथे या मुलाखतीचे आयोजन करण्याता आले आहे.
वृंदावनचे जयकांत मिश्रा, अयोध्येचे दोन महंत मिथलेश नंदिनी शरण आणि सत्यनारायण दास यांचा समावेश असलेली तीन सदस्यीय समिती उमेदवारांची मुलाखत घेत आहे.
काय आहेत अटी आणि नियम ?
मुलाखतीसाठी निवड झालेल्या 200 उमेदवारांपैकी 20 उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर 6 महिने या उमेदवारांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांची पुजारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. विविध पदांवर या पुजाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आलेली नाही, असे उमेदवारही मंदिर ट्रस्टकडून देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात. त्यानंतर फक्त प्रशिक्षणात सहभागी झालेल्या उमेदवारांना भविष्यात संधी दिली जाऊ शकते. उमेदवारांचे प्रशिक्षण आध्यात्मिक संतांनी तयार केलेल्या धार्मिक अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना अन्न आणि राहण्याची व्यवस्था मोफत केली जाणार आहे. याशिवाय 2000 ₹ मानधनही दिले जाईल, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी दिली आहे.
दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती*
कोणते प्रश्न विचारले जाणार ?
या मुलाखतीदरम्यान उमेदवारांना विविध प्रकारचे अनेक प्रश्न विचारण्यात येणार आहेत. मुख्यत: ‘संध्या वंदन’ म्हणजे काय?? या पूजेचा विधी कसा करतात?? पूजेसाठी कोणता मंत्र म्हटला जातो?? भगवान श्रीरामाची पूजा करण्यासाठी कोणता मंत्र म्हणतात?? याकरिता कर्मकांडातील कोणते विधी करणे आवश्यक आहे?? अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत.
पूजेची पद्धत रामानंदीय पंथानुसार
सध्या राम मंदिरात पंचोपचार पद्धतीप्रमाणे पूजा केली जाते, मात्र २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर रामानंदीय पंथानुसार पूजा केली जाईल. मुख्य पुजारी, सहाय्यक पुजारी आणि मंदिराचे सेवक राम लल्लाची पूजा करतील. या पंथानुसार केलेली पूजा पद्धती वैशिष्ट्यपूर्ण असून यामध्ये हनुमान चालीसाप्रमाणेच रामाची स्तुती केलेली नवीन पोथी लिहिण्याचे कामही सुरू आहे.
3000 applications for the post of priest in Ram temple
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची??,पवारांची की अजितदादांची??; आज सोमवारपासून नियमित सुनावणी!!
- रोहितच्या डोळ्यात अश्रू, भारतभर सन्नाटा; पंतप्रधान मोदींचे मनोधैर्य उंचावणारे ट्विट!!
- भारताच्या किरकोळ आव्हानाच्या सामन्यात डोके शांत ठेवून “हेड” लढला; ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप घेऊन गेला!!
- उत्तरकाशीमधील बोगद्यात ८ दिवसांपासून अडकून आहेत ४१ मजूर, गडकरी-धामींनी घेतला आढावा, म्हणाले…