विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – देशातील ३० उच्च न्यायालयांना लवकरच नवे मुख्य न्यायाधीश मिळणार आहेत. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने केंद्र सरकारला आठ नव्या न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली आहे.30 courts will get new judges
कोलकता उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल यांना बढती मिळाली असून अन्य उच्च न्यायालयांच्या पाच मुख्य न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची १६ सप्टेंबर रोजीच बैठक झाली होती. या बैठकीतच न्यायाधीशांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. कॉलेजियमने बिंदल यांच्याशिवाय न्या. रणजित. व्ही. मोरे. सतीशचंद्र शर्मा, प्रकाश श्रीवास्तव, आर.व्ही. मालीमठ, रितूराज अवस्थी,
अरविंदकुमार आणि प्रशांतकुमार मिश्रा यांच्या नावांची अनुक्रमे मेघालय, तेलंगण, कोलकता, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि आंध्रप्रदेश उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशपदासाठी शिफारस केली आहे.
30 courts will get new judges
महत्त्वाच्या बातम्या
- 25 वर्षीय मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि तिच्या मित्राचा गोव्यातील कार अपघातात मृत्यू
- लस घेऊनही क्वारंटाइन करण्याचा निर्णय, युनायटेड किंगडमचा निर्णय; शशी थरूर यांचा प्रखर विरोध
- भारताचे नवे हवाई दल प्रमुख म्हणून व्ही.आर. चौधरींची नियुक्ती, आरकेएस भदौरिया 30 सप्टेंबरला होणार निवृत्त
- तिबेटी तरुणांची चीनकडून बळजबरीने सैन्यात भरती, प्रशिक्षण देऊन एलएसीवर भारताविरुद्ध तैनात करण्याचा डाव