• Download App
    वसुधैव कुटुंबकम् ! सिंगापूरचा भारताला मदतीचा हात; 256 ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर मुंबई विमानतळावर दाखल! 256 oxygen concentrators arrive at Mumbai airport from Singapore

    वसुधैव कुटुंबकम् ! सिंगापूरचा भारताला मदतीचा हात; २५६ ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर मुंबई विमानतळावर दाखल

    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई: भारतातील कोरोनाची दुसरी लाट अनियंत्रित झाली आहे. अशा परिस्थितीत अनेक देश भारतातील ऑक्सिजन सिलिंडर्सच्या कमतरतेवर मात करण्यासाठी मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. दरम्यान, सिंगापूर भारताच्या मदतीसाठी पुढे आला आहे.भारतातील ऑक्सिजनची कमतरता पाहता सिंगापूरने भारताला मदत केली आहे .त्यानुसार आज सिंगापूरहून २५६ ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर भारतात दाखल झाले आहेत.256 oxygen concentrators arrive at Mumbai airport from Singapore

    कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आणि ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्यानंतर ऑक्सिजन थेरपीसाठी सर्वात जास्त ज्या उपकरणांना मागणी आहे त्यापैकी ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे एक आहे. विशेषत: रुग्णाला घरात आयसोलेशन दरम्यान आणि रुग्णालयात ऑक्सिजनची कमरता असल्यास हे कन्सन्ट्रेटर सर्वात जास्त उपयोगी ठरतं.

    मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिंगापूरहून २५६ ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर भारतात आणण्यात आलेत. ज्यांचं वजन जवळपास ५५१० किलो इतकं आहे.सिंगापूर एअरलाइन्समार्गे हे ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर भारतात आणण्यात आले.

    मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे, सध्याच्या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळाचं संपूर्ण पथक जीवनावश्यक वस्तूंची उभारणी आणि पुरवठा करण्याची अविरतपणे काम करतायत. एअर कार्गो अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. जगभरातील आवश्यक वैद्यकीय वस्तूंच्या वाहतुकीचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळाला अनुभव आहे.

    256 oxygen concentrators arrive at Mumbai airport from Singapore

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!