वृत्तसंस्था
गाझा : गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात एका दिवसात 25 पॅलेस्टिनींचा ( Palestinians ) मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा समावेश आहे. या हल्ल्यात एक महिला आणि तिच्या सहा मुलांचा मृत्यू झाला. गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 11 महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत 40 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.
दुसरीकडे गाझामध्ये 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच पोलिओचा एक रुग्ण आढळून आला आहे. मध्य गाझामध्ये एका 10 महिन्यांच्या बाळाला पोलिओ झाल्याचे निदान झाले आहे. जॉर्डनमधील मुलाच्या नमुन्याची तपासणी केल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे.
याआधी जूनमध्ये टाईप-2 पोलिओचा विषाणू गाझामध्ये पाण्याखाली सापडला होता. यानंतर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी मुलांच्या लसीकरणासाठी युद्धबंदीची मागणी केली होती.
गाझामध्ये पोलिओ लसीकरणासाठी जागतिक आरोग्य संघटनेसोबत काम करत असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की ते 13 लाख पोलिओ लस गोळा करण्यात व्यस्त आहे.
गाझामध्ये 11 महिन्यांपासून युद्ध सुरू
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला जवळपास 11 महिने उलटले आहेत. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सुमारे 1200 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी गाझामध्ये सुमारे 250 लोकांना ओलीस ठेवले होते.
इस्रायलच्या म्हणण्यानुसार, 111 लोक अजूनही हमासच्या कैदेत आहेत. यामध्ये 39 मृतदेहांचाही समावेश आहे. ओलिसांमध्ये 15 महिला आणि 5 वर्षाखालील 2 मुलांचा समावेश आहे. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायलने हमासविरोधात युद्धाची घोषणा केली होती. या युद्धात आतापर्यंत 329 इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार त्यांनी आतापर्यंत 15 हजारांहून अधिक हमास दहशतवाद्यांना ठार केले आहे. युद्धामुळे गाझामधील सुमारे 18 लाख लोकांनी आपली घरे सोडली आहेत. इस्त्राईल आणि दक्षिण लेबनॉनमध्येही हजारो लोकांना घरे सोडावी लागली आहेत.
25 Palestinians killed in Israeli attack
महत्वाच्या बातम्या
- Rakesh Pal : भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे चेन्नईत निधन
- Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांची खुसपटे; पण वरचढ योजनेची तोड का न सापडे??
- Champai Soren : झारखंडच्या माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश!
- Sukanta Majumdar : ममतांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच राहणार ; सुकांता मजुमदार