• Download App
    कोरोना अजून संपलेला नाही, युराेप, मध्य आशियात  आठ दिवसांत २४ हजार जणांचा बळी; लाटेचे संकट घोंगावतेय । 24,000 deaths in 8 days in Europe, Central Asia; Fear of another wave of corona

    कोरोना अजून संपलेला नाही, युराेप, मध्य आशियात  आठ दिवसांत २४ हजार जणांचा बळी; लाटेचे संकट घोंगावतेय

    वृत्तसंस्था

    जिनेव्हा : कोरोना अजून संपलेला नाही, युराेप, मध्य आशियात आठ दिवसांत २४ हजार जणांचा बळी गेला आहे. कोरोना लाटेचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे भारतीयांनी सावध राहण्याची गरज आहे. 24,000 deaths in 8 days in Europe, Central Asia; Fear of another wave of corona

    युराेप आणि मध्य आशिया खंडातील ५३ देशांमध्ये काेराेनाच्या नव्या लाटेची भीती जागतिक आराेग्य संघटनेने व्यक्त केली. या भागात गेल्या आठवडाभरात १८ लाख नवे रुग्ण आढळले असून, २४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात होत आहे.



    जागतिक आराेग्य संघटनेच्या विभागीय कार्यालयाच्या प्रमुख डाॅ. हॅन्स क्लूज यांनी नव्या रुग्णांची संख्या पुन्हा रेकाॅर्ड पातळीवर पाेचत असल्यावरून गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या ५३ देशांमध्ये आणखी एक लाट येण्याची शक्यता आहे किंवा नव्या लाटेचा सामना करीत आहेत. संसर्ग पुन्हा वेगाने वाढू लागला आहे. युराेप पुन्हा एकदा महामारीच्या केंद्रस्थानी आला आहे.

    फेब्रुवारीपर्यंत पाच लाख मृत्यू

    गेल्या आठवड्यात ५३ देशांमध्ये काेराेनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण दुप्पटीने वाढले आहे.  हीच परिस्थिती कायम राहिल्यास फेब्रुवारीपर्यंत आणखी पाच लाख लाेकांचा महामारीमुळे मृत्यू हाेऊ शकताे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

    24,000 deaths in 8 days in Europe, Central Asia; Fear of another wave of corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही