वृत्तसंस्था
उदयपूर : द केरळ स्टोरी सिनेमाचे मोबाईल स्टेटस ठेवले म्हणून एका दलित युवकाला मारहाण करून त्याचा गळा चिरण्याची धमकी राजस्थान मधल्या उदयपूर मध्ये दिली आहे. 24 year-old Dalit man. Within hours, he was thrashed by a mob of twenty and threatened that his throat will be slit
अभिषेक नामक एक युवक शनिवारी द केरळ स्टोरी सिनेमा पाहून आला आणि त्याने आपल्या मोबाईलवर त्या सिनेमाचे स्टेटस ठेवले. तो सिनेमा पाहून येत असतानाच 3 युवकांनी त्याला अडवून मारहाण केली तसेच केरळ स्टोरीचे स्टेटस काढून टाकले नाही, तर त्याला त्याचा गळा चिरण्याचीही धमकी दिली. या प्रकारामुळे अशोक गहलोत राजवटीतील राजस्थानातील कायदा आणि सुव्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. द केरळ स्टोरी सिनेमा देशभर प्रदर्शित झाला असून अनेक चित्रपटगृहांमध्ये वेगवेगळ्या राज्य सरकारच्या पोलिसांनी संरक्षण पुरविले आहे. मात्र राजस्थानात त्याचा अभाव दिसतो आहे.
दलित युवकाला मारहाण करणाऱ्यांच्या विरुद्ध विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उदयपूर मध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उदयपूर पोलीस यासंबंधीचा पुढचा तपास करीत आहेत.
मात्र याच राजस्थानात मध्यंतरी एका टेलरची अशीच गळा चिरून हत्या करण्यात आली होती. नुपूर शर्मा प्रकरण गाजत असताना त्याने केवळ मोबाईलवर त्यासंबंधी स्टेटस ठेवले म्हणून दोन मुस्लिम युवक त्याच्या दुकानात कपडे शिवण्याच्या निमित्ताने शिरले आणि त्यांनी त्याच्यावर कोयते सूऱ्यांनी वार करून त्याची हत्या केली होती.
त्यानंतर आता केवळ द केरल स्टोरी सिनेमाचे स्टेटस मोबाईल वर ठेवल्याने दलित युवकाला मारहाण करून त्याचा गळा करण्याची धमकी देखील राजस्थानात उदयपूरमध्ये देण्यात आली आहे. राजस्थान मधील काँग्रेसच्या अशोक गेहलोत राजवटीत कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे हे निदर्शक आहे.
24 year-old Dalit man. Within hours, he was thrashed by a mob of twenty and threatened that his throat will be slit
महत्वाच्या बातम्या
- 68 न्यायाधीशांच्या पदोन्नतीविरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, याचिकाकर्त्याने म्हटले- राहुल यांना शिक्षा सुनावणाऱ्या जजचाही समावेश
- ‘द केरला स्टोरी’ तामिळनाडूमध्ये प्रदर्शित होणार नाही, मल्टिप्लेक्स संघटनेचा निर्णय, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी दिला हवाला
- केरळमध्ये हाऊसबोट बुडाल्याने 21 जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख, मृतांच्या वारसांना मदत जाहीर
- 2024 प्रजासत्ताक दिन संचलनात फक्त महिला सैनिक, अधिकारी, बँड आणि चित्ररथ हवेत; संरक्षण मंत्रालयाची ऐतिहासिक सूचना