वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनासंदर्भात मंगळवारी संध्याकाळी मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी I.N.D.I.A.मध्ये सहभागी लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत I.N.D.I.A. आघाडीमध्ये समाविष्ट 28 पक्षांपैकी 24 पक्ष 18 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाला उपस्थित राहतील, असा निर्णय घेण्यात आला.24 parties of I.N.D.I.A to go to special session of Parliament; Sonia Gandhi will write a letter to PM Modi today
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, काँग्रेस संसदीय पक्षाच्या (सीपीपी) अध्यक्षा सोनिया गांधी या 24 पक्षांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गेल्या आठवड्यात संसदेच्या 18 ते 22 सप्टेंबर या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनाची माहिती दिली होती.
खरगे म्हणाले – भाजपला मुद्द्यांवरून लक्ष वळवायचे आहे
काँग्रेसचे अध्यक्ष खरगे म्हणाले, ‘पहिल्यांदाच मोदी सरकार अजेंडा जाहीर न करता संसदेचे विशेष अधिवेशन बोलावत आहे. कोणत्याही विरोधी पक्षाशी सल्लामसलत किंवा माहिती देण्यात आली नाही. लोकशाही चालवण्याचा हा मार्ग नाही. मोदी सरकार दररोज प्रसारमाध्यमांमध्ये संभाव्य अजेंड्याची कहाणी लावते आणि लोकांवर भार टाकणाऱ्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचे निमित्त तयार करत असते. महागाई, बेरोजगारी, मणिपूर, चिनी अतिक्रमण, कॅग अहवाल, घोटाळे इत्यादी मुद्द्यांवरून लक्ष वळवून भाजपला लोकांची फसवणूक करायची आहे.
संसदेच्या 5 दिवसांच्या विशेष अधिवेशनात या प्रस्तावांवर चर्चा शक्य
संसदेच्या विशेष अधिवेशनात कोणतेही विधेयक मांडले जाणार नाही. तसेच संयुक्त अधिवेशनही बोलावले जाणार नाही. पाच दिवसांत 4-5 प्रस्ताव आणले जातील, त्यावर चर्चा करून आवाजी मतदानाने पारित केले जाईल. संसदीय कामकाज मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही सभागृहांच्या चर्चेसाठी विशेष सत्र बोलावण्यात आले आहे, त्यामुळे संयुक्त अधिवेशन होणार नाही.
संयुक्त अधिवेशन झाले असते तर महिला आरक्षण विधेयक किंवा ‘एक देश एक निवडणूक’ असे काही महत्त्वाचे प्रलंबित विधेयक मांडले जाण्याची शक्यता होती. G-20, चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग, देश तिसरी आर्थिक शक्ती बनणे आणि इंडियाऐवजी भारताचा वापर करणे यासंबंधी चर्चा करून सरकार प्रस्ताव मांडू शकते आणि तो मंजूर करून घेऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
24 parties of I.N.D.I.A to go to special session of Parliament; Sonia Gandhi will write a letter to PM Modi today
महत्वाच्या बातम्या
- गोविंदांच्या आनंदावर विरजण; यंदा दहीहंडी केवळ रात्री दहा वाजेपर्यंत
- हरियाणाच्या कर्नालमध्ये काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी, एकमेकांविरोधात घोषणाबाजी
- द प्राईम मिनिस्टर ऑफ भारत नरेंद्र मोदी आज आसियान बैठकीसाठी इंडोनेशियात!!
- Chandrayaan-3 Mission : चंद्रावर स्लीपिंग मोडमध्ये असलेल्या विक्रम लँडरचे छायाचित्र आले समोर , इस्रोने दिला मोठा अपडेट