• Download App
    मणिपूरमध्ये २४ बंकर उध्वस्त; डोंगर-दऱ्यांमध्ये शोधमोहीम सुरू, ३५२ जण ताब्यात! 24 bunkers demolished in Manipur Research campaign started in mountains and rivers 352 people arrested

    मणिपूरमध्ये २४ बंकर उध्वस्त; डोंगर-दऱ्यांमध्ये शोधमोहीम सुरू, ३५२ जण ताब्यात!

    (संग्रहित छायाचित्र)

    शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त;  मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी बंकर उध्वस्त करण्याचे दिले होते आदेश.

    विशेष प्रतिनिधी

    इंफाळ :  मणिपूरमध्ये लष्कर आणि सुरक्षा दलांनी डोंगर आणि खोऱ्यात बांधलेले बंकर उध्वस्त सुरुवात केली आहे. या बंकरचा वापर सशस्त्र बंडखोर करत होते. हे बंकर्स पाडण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला होता. मणिपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी ३ जुलै रोजी राज्यात बांधलेले बंकर पाडण्याचा निर्णय घेतला होता. 24 bunkers demolished in Manipur Research campaign started in mountains and rivers 352 people arrested

    यानंतर केंद्रीय दल आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी शोध मोहीम सुरू केली. डोंगर-दऱ्या असणाऱ्या जिल्ह्यांतील संवेदनशील आणि सीमावर्ती भागात आणि इंफाळ पूर्व, कांगपोकपी आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये सशस्त्र बंडखोरांनी वापरलेले २४ बंकर नष्ट करण्यात आले. याशिवाय इतर ठिकाणीही अशीच मोहीम राबवण्यात येणार आहे.

    मोठ्याप्रमाणात शस्त्रे जप्त –

    दरम्यान, लष्कर, आसाम रायफल्स, सुरक्षा दलाचे जवान आणि मणिपूर पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली आहे. यादरम्यान गेल्या २४ तासांत शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. यासोबतच ३५२ बंडखोरांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

    24 bunkers demolished in Manipur Research campaign started in mountains and rivers 352 people arrested

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये