• Download App
    Palwal Gang Rape: दिल्लीहून मैत्रीनीला बोलावत २५ जनांनी केला सामूहिक बलात्कार ; मुख्य आरोपी फेसबुक फ्रेंडला अटक 23-year-old woman gang-raped by 25 in Haryana's Palwal, key accused facebook friend arrested

    Palwal Gang Rape: दिल्लीतील मैत्रीणीला बोलावत २५ जनांनी केला सामूहिक बलात्कार ; मुख्य आरोपी फेसबुक फ्रेंडला अटक

    • सावधान! फेसबुकवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताना सावध राहा. एका तरुणीला फेसबुकवर मैत्री करणं अंगलट आलं आहे.

    • हरियाणाच्या पलवलमध्ये एक धक्कादायक प्रकरण घडलं आहे. दिल्लीतील एका युवतीला बोलावत सामूहिक बलात्कार करण्यात आला. फेसबुकवर मैत्रीनंतर एका मित्राने तिला भेटण्यासाठी बोलावले असल्याचा आरोप तीने केला आहे. जेव्हा ती येथे आली तेव्हा २५ जनांनी तिच्यावर बलात्कार केला.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीीतील एका २२ वर्षीय युवतीवर हरियाणा येथे सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे .आश्चर्याची गोष्ट म्हणजे तीच्याबरोबर एक-दोन नव्हे, तर  रात्रीपासून दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत २५ जणांनी आळीपाळीने बलात्कार केला. तिला फुस लाऊन आई-वडिलांशी ओळख करुन देण्याच्या बहाण्याने तिच्या फेसबुक मित्राने तीला हरियाणातील पलवल येथे बोलावले होते . या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली .पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.23-year-old woman gang-raped by 25 in Haryana’s Palwal, key accused facebook friend arrested

    इतक्या मोठ्या घटनेनंतर तीला बरे होण्यास ९ दिवस लागले. त्यानंतर तीने पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. या पिडीतेने आपल्या तक्रारीमध्ये सांगितले की यावर्षी जानेवारीमध्ये तिने फेसबुकवर सागर (२३) नावाच्या युवकाशी मैत्री केली. दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या, मैत्री जसजशी वाढत गेली तसतसे दोघांनी एकमेकांना आपला मोबाइल नंबर दिला आणि मग दोघेही तासनतास मोबाईलवर बोलू लागले.

    पिडीतेने सांगितले की ती घरकाम करते आणि चार वर्षांपासून दिल्लीत राहत आहे. या आरोपीने तिच्यासमोर  प्रेम प्रस्ताव ठेवला आणि नंतर तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले.आरोपीने तीला सांगितले की त्याचे पालक पलवलच्या होडल गावात राहतात. त्याला तिची आई-वडिलांशी ओळख करून द्यायची आहे. त्याने खोटं बोलून त्या युवतीला भेठन्यास  बोलावले.

    पिडीतेने  सांगितले की ३ मे रोजी ती होडल येथे गेली आणि सागरला भेटली. पण सागर तीला घरी घेऊन जाण्याऐवजी रामगड गावच्या जंगलात घेऊन गेला. त्याचा भाऊ आणि त्याचे मित्र तेथील ट्यूबवेलजवळ दारू पित होते.त्या सर्वांनी मिळून रात्रभर तीच्यावर बलात्कार केला.

    दुसर्या दिवशी सकाळी तीला आकाश नावाच्या व्यक्तीकडे नेण्यात आले तीथे देखील ५जनांनी तीच्यावर बलात्कार केला .तीची गंभीर अवस्था पाहता त्या नराधमांनी तीला बदरपुर सीमेवर फेकून दिले .

    मुख्य आरोपीला अटक, इतरांचा शोध
    पिडीतेला या आघातातून सावरण्यास  नऊ दिवस लागले. १२ मे रोजी तिने हसनपूर पोलिस स्टेशन गाठले आणि सागरसह २४ जणांविरूद्ध सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली. घटनेपासून ती अंथरुणावर असल्याचे तीने  सांगितले. तीची शारीरिक आणि मानसिक स्थिती अशी नव्हती की ती काहीही करु शकेल. जेव्हा प्रकृती जरा सुधारली तेव्हा ती पोलिस ठाण्यात आली. हसनपूर पोलिस स्टेशनचे एसएचओ राजेश यांनी सांगितले की शुक्रवारी सागरला अटक केली असून चौकशीनंतर इतरांना लवकरच अटक करण्यात येईल.

    23-year-old woman gang-raped by 25 in Haryana’s Palwal, key accused facebook friend arrested

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!