वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मूच्या अखनूरमध्ये गुरुवारी दुपारी यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस 150 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला. 69 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो. जखमींना उपचारांसाठी जम्मूच्या अखनूर आणि सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.22 killed, 69 injured as bus plunges into 150 feet deep ravine in Jammu; The pilgrims were from UP
जम्मू-पुंछ महामार्गावर हा अपघात झाला. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सुमारे 90 लोक बसमध्ये प्रवास करत होते. हाथरसहून शिव खोरीला जात होते. बचावकार्य सुरू आहे. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. केंद्र सरकारने मृतांच्या वारसांना 2-2 लाख देण्याची घोषणा केली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे.
15 नोव्हेंबर 2023 रोजी जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील अस्सार भागात बस 300 फूट खोल दरीत कोसळली होती. या अपघातात 9 महिलांसह 38 जणांचा मृत्यू झाला. बस किश्तवाडहून जम्मूला जात होती. पोलीस आणि एसडीआरएफच्या पथकांसोबत स्थानिक लोकांनीही मदत आणि बचाव कार्य केले.
बसचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी ती कापावी लागली. जखमींना किश्तवार जिल्हा रुग्णालयात आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), डोडा येथे दाखल करण्यात आले. काही लोकांना एअरलिफ्ट करून जम्मूला नेण्यात आले.
22 killed, 69 injured as bus plunges into 150 feet deep ravine in Jammu; The pilgrims were from UP
महत्वाच्या बातम्या
- नाशिकमध्ये गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते गंगा गोदावरी महाआरती; सुश्राव्य वाणीच्या रामकथेने भाविक मंत्रमुग्ध!!
- नाशिकमध्ये गोविंद देवगिरीजी महाराजांचा आज पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार प्रदान सोहळा!!
- पॉर्न स्टार खटल्यात सर्व 34 आरोपांमध्ये ट्रम्प दोषी आढळले; 11 जुलै रोजी शिक्षेची सुनावणी