• Download App
    अलिगडमध्ये विषारी दारू पिल्याने २२ जणांचा मृत्यू, २८ जणांची प्रकृती गंभीर|22 died in UP Hooch tragedy

    अलिगडमध्ये विषारी दारू पिल्याने २२ जणांचा मृत्यू, २८ जणांची प्रकृती गंभीर

    विशेष प्रतिनिधी

    अलिगड : उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये विषारी दारूच्या सेवनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आज २२ वर पोचली असून अन्य २८ जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो.22 died in UP Hooch tragedy

    या मद्यसेवनामुळे शुक्रवारी रात्री सातजण मरण पावले होते. अन्य गंभीर आजारी असलेल्या २८ रुग्णांवर येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, अलिगड मुस्लिम विद्यापीठ आणि मल्खानसिंह जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



    शेजारील खेड्यांमधून देखील आणखी काही नागरिक आजारी पडल्याच्या बातम्या येत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. लोढा, खैर आणि जावान या तीन खेड्यांमधील १५ लोकांचा शुक्रवारी मृत्यू झाला.

    पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला वेग दिला असून आतापर्यंत विषारी दारूच्या विक्रीमध्ये सहभागी असलेल्या पाचजणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य सूत्रधार अनिल चौधरी याचाही समावेश आहे.

    याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत बाराजणांविरोधात गुन्हे दाखल केले असून जिल्हाभरात अनेक ठिकाणांवर छापेही घालण्यात आले.

    22 died in UP Hooch tragedy

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती