• Download App
    2000च्या नोटा खोट्या आढळल्यास होईल FIR, जाणून घ्या, नोटा बदलून घेण्यासाठी RBIची गाइडलाइन|2000 notes found fake, FIR, Know, RBI's guidelines for exchange of notes

    2000च्या नोटा खोट्या आढळल्यास होईल FIR, जाणून घ्या, नोटा बदलून घेण्यासाठी RBIची गाइडलाइन

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दोन हजारच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासंदर्भात आरबीआयने दिशानिर्देश जारी केले आहेत. यानुसार जर ग्राहकांनी बँकेत बदलून घेण्यासाठी आणलेल्या नोटांमध्ये बनावट नोटा आढळल्यावर त्यांच्यावर फेक करन्सीचा शिक्का मारून त्या जप्त केल्या जातील. तसेच कायदेशीर कारवाईही केली जाईल.2000 notes found fake, FIR, Know, RBI’s guidelines for exchange of notes

    काय आहेत दिशानिर्देश?

    • बँकेत आणल्या जाणाऱ्या 2000 च्या नोटा बारकाईने तपासल्या जातील. त्या खऱ्या आहेत की खोट्या हे तपासण्यासाठी नोट सॉर्टिंग मशिनद्वारे त्या सॉर्ट केल्या जातील.
    • आरबीआयच्या मास्टर इन्स्ट्रक्शन्सचे पालन करून नोटांची पडताळणी केली जाईल.
    • यातील एखादी नोट बनावट आढळल्यास संबंधित व्यक्तीला पैसे दिले जाणार नाही.
    • यानंतर त्या नोटेवर फेक करन्सीचा शिक्का मारून ती जप्त केली जाईल.
    • अशा प्रत्येक नोटबद्दलची नोंद एका वेगळ्या रजिस्टरमध्ये केली जाईल.
    • एखादी बँक अशा नोटा ग्राहकांना परत देताना आढळल्यास बँकेवर दंडात्मक कारवाई होईल.
    • एखाद्या व्यक्तीकडे नोटा बदलून घेताना चार बनावट नोटा आढळल्यास याची माहिती पोलिसांना दिली जाईल.
    • जर त्या व्यक्तीकडे पाच किंवा त्यापेक्षा जास्त बनावट नोटा आढळल्यास या प्रकरणात एफआयआर दाखल करून तपास केला जाईल.
    • नोटा बदलून घेताना बनावट नोटांचा धोका बघता तुम्ही स्वतःही अशा नोटा ओळखू शकता.


    अशा ओळखा बनावट नोटा

    • नोटेच्या मागच्या भागावर मंगळयानाचे चित्र आहे.
    • नोटचा आकार 66mm x 166mm इतका आहे.
    • नोटवर 2000 असे अंकात व अक्षरात छापलेले आहे. तसेच नोटवर इलेक्ट्रोटाइप(2000) वॉटरमार्कही आहे.
    • महात्मा गांधींचा फोटो, गॅरंटी क्लॉजसह गव्हर्नर यांची स्वाक्षरी आणि आरबीआयचे चिन्ह नोटेवर आहे.
    • महात्मा गांधींच्या फोटोसह नोटेवर भारत-इंडिया असे लिहिलेला कलर शिफ्ट विंडो सेफ्टी थ्रेड आहे. तिरका बघितल्यावर याचा रंग हिरवा-निळा असा बदलतो.
    • नोटेवर अशोक स्तंभाचेही चित्र आहे. अंधांना नोट ओळखण्यासाठी अशोक स्तंभ, महात्मा गांधींचा फोटो थोडा उठावदार छापण्यात आलेला आहे.

    2000 notes found fake, FIR, Know, RBI’s guidelines for exchange of notes

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!