• Download App
    2000 कोटींची ड्रग्ज तस्करी करणाऱ्या दाक्षिणात्य निर्मात्याला NCBकडून अटक, सत्ताधारी द्रमुकचा आहे कार्यकर्ता|2000 crores drug smuggling south producer arrested by NCB, ruling DMK worker

    2000 कोटींची ड्रग्ज तस्करी करणाऱ्या दाक्षिणात्य निर्मात्याला NCBकडून अटक, सत्ताधारी द्रमुकचा आहे कार्यकर्ता

    वृत्तसंस्था

    चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील निर्माता जफर सादिकला शनिवारी (9 मार्च) अटक करण्यात आली. त्याच्यावर 2000 कोटी रुपयांच्या ड्रग्जची विदेशात तस्करी केल्याचा आरोप आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) जफरचा चार महिन्यांपासून शोध घेत होते. जफर हा तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) चा माजी कार्यकर्ता होता.2000 crores drug smuggling south producer arrested by NCB, ruling DMK worker

    मदुराईमधील दोन रेल्वे प्रवाशांकडून आणि चेन्नईतील डंप यार्डमधून अधिकाऱ्यांनी 180 कोटी रुपयांचे मेथॅम्फेटामाइन जप्त केल्यानंतर एका आठवड्यानंतर जफरला अटक करण्यात आली आहे. जफर या ड्रग्जची श्रीलंकेत तस्करी करण्याच्या तयारीत होता, असे सांगण्यात येत आहे.



    एनसीबीनुसार, जफर सादिक हा भारत-ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड ड्रग्ज तस्करीच्या नेटवर्कचा प्रमुख आहे. त्याने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये 2000 कोटी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी केली आहे. एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जफरने एकूण 45 वेळा परदेशात 3,500 किलो स्यूडोफेड्रिन औषधाची विक्री केली. स्यूडोफेड्रिन हे सिम्पाथोमिमेटिक औषध आहे. हे सायनस डिकंजेस्टेंट/उत्तेजक म्हणून वापरले जाऊ शकते.

    तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई म्हणाले की, तामिळनाडू देशाचे ड्रग कॅपिटल बनले आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया आणि द्रमुकचा कार्यकर्ता जफर सादिक हा फरार आहे. एनसीबी द्रमुकच्या अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकत आहे. एक पोस्ट शेअर करताना अन्नामलाई म्हणाले, ‘1,200 कोटी रुपयांचे मेथाम्फेटामाइन, जे आधी तमिळनाडूमार्गे गुजरातच्या किनारपट्टीवर पोहोचले होते, जप्त करण्यात आले होते. महसूल गुप्तचर संचालनालयाने मदुराईमध्ये 30 किलो मेथॅम्फेटामाइन जप्त केले.

    जफरच्या आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटशी संबंधित आणखी तीन जणांना नुकतेच एनसीबीने दिल्लीतून अटक केली. अमेरिकेचे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) देखील या तपासात भारतीय एजन्सीला सहकार्य करत आहे.

    2000 crores drug smuggling south producer arrested by NCB, ruling DMK worker

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’