वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या ( Jammu and Kashmir ) नौशेरामध्ये सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. लष्कराने 8 सप्टेंबरच्या रात्री उशिरा दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. सध्या कारवाई सुरू आहे.
लष्कराने एक्सवर ही माहिती दिली. गेल्या आठवडाभरात दहशतवादी चकमकीची ही दुसरी घटना आहे. 2 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील सुंजवान मिलिटरी स्टेशनवर दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार केला होता. यामध्ये एक जवान शहीद झाला.
29 ऑगस्ट : कुपवाडा येथे चकमकीत 3 दहशतवादी ठार
29 ऑगस्ट रोजी कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी मारले गेले. यापैकी माछिलमध्ये दोन तर तंगधारमध्ये एक दहशतवादी मारला गेला. 28-29 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा खराब हवामानात माछिल आणि तंगधारमध्ये संशयास्पद हालचाली दिसल्याचं लष्करानं म्हटलं होतं. यानंतर लष्कर आणि पोलिसांनी येथे शोध सुरू केला. यादरम्यान चकमक सुरू झाली.
14 ऑगस्ट : डोडा येथे कॅप्टन दीपक सिंह शहीद
14 ऑगस्ट रोजी डोडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत राष्ट्रीय रायफल्सचे आर्मी कॅप्टन दीपक सिंह शहीद झाले. दोडा येथील आसर वनक्षेत्रात सुरू असलेल्या चकमकीत ते संघाचे नेतृत्व करत होते. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. 16 जुलै रोजीही डोडा येथील देसा भागात झालेल्या चकमकीत कॅप्टनसह 5 जवान शहीद झाले होते.
2 terrorists killed in Nowshera, Jammu and Kashmir
महत्वाच्या बातम्या
- Congress : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अन् ‘आप’चं अखेर जुळलं!
- Manoj jarange + Sambhji Raje : जरांगे + संभाजीराजे : चर्चा तिसऱ्या आघाडीची; पण निवडणुकीनंतरच्या समीकरणात सत्ता भरती कुणाची??
- Sharad Pawar : गुरुने दिला छुपा हा वसा; जरांगेंच्या तोंडी फक्त पाडण्याची भाषा!!
- Dalpati Vijay : दलपती विजय तमिळनाडूत 2026च्या निवडणुकीच्या लढाईत उतरण्यास तयार