विशेष प्रतिनिधी
घणसोली : नवी मुंबईमधील घणसोली येथील शेतकरी संस्था शाळेमधील एकूण 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही बातमी नुकतीच आली होती. मात्र आता याच शाळेतील आणखी 2 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. येथील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट केली जात आहे. तर अनेक विद्यार्थ्यांचे टेस्टचे रिझल्ट यायचे बाकी आहे. तर हाती आलेल्या रिझल्ट पैकी आणखी 2 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे.
2 more children from school in navi mumbail are corona positive, school closed till 26th December
16 जणांना कोरोनाची लागण झाली ही बातमी येताच अनेक विद्यार्थ्यांनी शाळेला येण्याचे टाळले आहे. त्यामुळे जे विद्यार्थी शाळेला आले नाहीत त्यांची टेस्ट घरी जाऊन करणार असल्याची बातमी शाळेचे मुख्याध्यापक आर बी जाधव यांनी दिली आहे.
तर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी 26 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना बाधित विद्यार्थ्यांना सिडको प्रदर्शनी सेंटर येथे उपचार दिले जाणार आहेत. तर सर्व कोरोना बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. अशी माहिती मुख्याध्यापक जाधव यांनी या वेळी दिली आहे.
2 more children from school in navi mumbail are corona positive, school closed till 26th December
महत्त्वाच्या बातम्या
- समीर वानखेडे यांची मुदत 31 डिसेंबरला संपणार; मुदतवाढ मागितली नाही; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची माहिती
- मुलींनी प्रजनन क्षमतेच्या वयात लग्न करणे उत्तम ; समाजवादी पार्टी नेते हसन
- एन्जॉय द रेप; काँग्रेस आमदार रमेश यांना प्रियांका गांधी यांनी झापले पण कायदेशीर किंवा पक्षीय कारवाईचे काय??
- 2020-21 मध्ये पहिल्या 7 महिन्यातच भारताच्या तांदूळ निर्यातीत वाढ