• Download App
    काश्मिरी मुस्लिमांकडून श्री रामलल्लांच्या सेवेसाठी 2 किलो ऑरगॅनिक केशर; अभिषेकासाठी अफगाणिस्तानच्या नदीतूनही आले पाणी!! 2 kg of organic saffron for the service of Shri Ramlalla from Kashmiri Muslims

    काश्मिरी मुस्लिमांकडून श्री रामलल्लांच्या सेवेसाठी 2 किलो ऑरगॅनिक केशर; अभिषेकासाठी अफगाणिस्तानच्या नदीतूनही आले पाणी!!

    विशेष प्रतिनिधी

    अयोध्या : अयोध्येत राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचा आनंद देशात आणि परदेशात साजरा होत असताना देशातील विरोधी पक्ष मात्र “राजकीय दुःखी” आहेत त्यांचे नेते या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. 2 kg of organic saffron for the service of Shri Ramlalla from Kashmiri Muslims

    परंतु, देशातल्या कोणत्याही समाजाला त्याचा फरक पडलेला नाही. उलट सर्व समाजांचे नागरिक या सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले आहेत. श्री रामलल्लांच्या सेवेसाठी काश्मिरी मुस्लिम बांधवांनी दोन किलो ऑरगॅनिक केसर पाठवले आहे, त्याचबरोबर अफगाणिस्तान मधील काबूल नदीचे पाणी श्री रामलल्लांच्या अभिषेकासाठी अयोध्येत आले आहे.


    अयोध्यातला श्री रामलल्लांची मूर्ती आसनावर विराजमान; पहिली झलक समोर!!


    श्री रामलल्ला तब्बल 500 वर्षांच्या संघर्षानंतर भव्य राम मंदिरात पुन्हा विराजमान होणार आहेत. रामलल्लांची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आली आहे. राममहोत्सावाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण अयोध्यानगरी सजवण्यात आली आहे. देशातील आणि जगभरातील हजारो भाविक अयोध्येत दाखल होत आहेत. राम मंदिर लोकार्पणाचा दिवस हा अतिशय मोठा असणार आहे. या दिवसाची नोंद इतिहासात होणार आहे.

    अनेक भाविक राम मंदिरासाठी वेगवेगळ्या भेटवस्तू देत आहेत. अयोध्येतील राम मंदिरासाठी काश्मीरच्या मुस्लिम समाजाच्या बांधवांनी विशेष ऑरगॅनिक केसर पाठविले आहे, तसेच आफिगाणिस्तानातल्या काबूल नदीचे पाणीही रामलल्लांच्या अभिषेकासाठी पाठवण्यात आले आहे. अयोध्येत विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी काश्मीर, तामिळनाडू येथून आलेले गिफ्ट्स यजनान डॉ. अनिल मिश्रा यांच्याकडे सुपूर्द केले.

    यावेळी आलोक कुमार यांनी प्रतिक्रिया दिली.

    काश्मीरमधून काही मुस्लिम बांधव आले होते. त्यांनी खूप आनंद व्यक्त केला की, इथे राम मंदिर बनत आहे. आमचा धर्म वेगळा आहे. पण आपल्या सर्वांचे पूर्वज एकच आहेत. राम हे आमचे आदरणीय पूर्वज आहेत. त्यानंतर त्यांनी मला काश्मीरहून आणलेले 2 किलो केसर श्री रामलल्लांच्या सेवेसाठी भेट दिले. तामिळनाडूच्या कापड निर्मात्यांनी श्रीराम मंदिराचे चित्र असलेली रेशीम चादर पाठवली आहे, तर अफगाणिस्तान येथून कुभा (काबुल) नदीचे पाणी श्रीरामांच्या अभिषेकासाठी पाठवण्यात आले आहे, असे आलोक कुमार यांनी सांगितले.

    2 kg of organic saffron for the service of Shri Ramlalla from Kashmiri Muslims

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज