वृत्तसंस्था
विजापूर : छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीच्या स्फोटात दोन एसटीएफ जवान शहीद झाले आहेत. तर 4 जवान जखमी झाले आहेत. हे जवान नक्षलविरोधी अभियानावर गेले होते, असे सांगण्यात येत आहे. परतत असताना विजापूरच्या तर्रेमजवळ आयईडीचा स्फोट झाला.2 jawans martyred, 4 injured in naxal attack in Chhattisgarh; IED blast while security forces are returning from mission
मिळालेल्या माहितीनुसार, दरभा विभागातील नक्षलवादी विजापूर, सुकमा आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कारवाईसाठी तीन जिल्ह्यांतून एसटीएफ, डीआरजी, कोब्रा आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक पाठवण्यात आले.
भरत साहू आणि सत्येर सिंग कांगे अशी शहीद झालेल्या एसटीएफ कॉन्स्टेबलची नावे आहेत. जखमी जवानांमध्ये पुरुषोत्तम नाग, कोमल यादव, सियाराम सोरी आणि संजय कुमार यांचा समावेश आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयातून हेलिकॉप्टरने रायपूरला आणण्यात येणार आहे.
बुधवारी झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळावरून शस्त्रे आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. सुमारे 6 तास ही चकमक चालल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, चकमकीत एका उपनिरीक्षकासह दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी उपनिरीक्षक सतीश पाटील हे महाराष्ट्राच्या C-60 दलाचे शिपाई आहेत. त्याच्या डाव्या खांद्याला गोळी लागली. कांकेर येथील बांदा येथून त्यांना हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे रवाना करण्यात आले. ही चकमक महाराष्ट्रातील कांकेर आणि गडचिरोली येथील पंखजूरच्या जंगलात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जानेवारी ते 17 जुलैपर्यंत 150 नक्षलवादी मारले गेले
बुधवारी झालेल्या चकमकीमुळे, जानेवारीपासून छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या 150 वर पोहोचली आहे. नारायणपूरसह सात जिल्हे असलेल्या बस्तर विभागात १३६ माओवादी ठार झाले, तर रायपूर विभागातील धमतरी जिल्ह्यात आणखी दोन माओवादी ठार झाले.
2 jawans martyred, 4 injured in naxal attack in Chhattisgarh; IED blast while security forces are returning from mission
महत्वाच्या बातम्या
- ट्रम्प यांच्या समर्थनासाठी पुढे आले भारतवंशी रामास्वामी- निक्की हेली; ते राष्ट्राध्यक्ष असताना पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला नव्हता!
- श्रीलंका अंडर-19 क्रिकेटच्या माजी कर्णधाराची हत्या; घरात घुसून झाडली गोळी
- पवारांच्या भरवशावर उभा राहिलेले शेकापचे उमेदवार पडल्यामुळे काँग्रेस 7 आमदारांवर “कठोर” कारवाई करेल का??
- अग्निवीर योजनेवर काँग्रेसची आगपाखड; पण हरियाणात अग्निवीरांवर सवलतींचा वर्षाव!!