वृत्तसंस्था
तिरुवानंतपुरम : देवभूमी असा लौकिक असलेल्या केरळ राज्यात विधानसभेच्या 140 जागांसाठी मतदान झाले. निवडणूक आयोगाने एकाच टप्प्यात ही निवडणूक आज 6 एप्रिलला घेतली आहे.2.74 crore voters for 957 candidates in Kerala; 58.66 per cent polling till 5:45 pm
भाजपने मेट्रोमॅन इ श्रीधरन यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यावर भाजपचा कल हा संपूर्णतः विकासावर असल्याचे सिद्ध झाले होते. विधानसभेची निवडणूक तिरंगी होत आहे. राज्यात डाव्या लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर असून काँग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडी आणि भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत थेट लढत होत आहे.
दरम्यान, दुपारी 3.46 वाजेपर्यंत 58.66 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. सकाळी 7 वाजता मतदानास सुरुवात झाली ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यास मदत होती. 2.74 कोटी मतदार 957 उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद केले.