• Download App
    मुंबई बॉम्बस्फोटातील 4 वॉन्टेड आरोपींना अटक; गुजरात एटीएसची मोठी कारवाई!!1993: Arrest of 4 wanted accused in Mumbai blasts; Big action of Gujarat ATS !!

    1993 : मुंबई बॉम्बस्फोटातील 4 वॉन्टेड आरोपींना अटक; गुजरात एटीएसची मोठी कारवाई!!

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : गुजरात एटीएसने मोठी कारवाई करत ११९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपींना अटक केली आहे. गुजरात एटीएसने अबू बकर, युसुफ भटाका, शोएब बाबा आणि सैय्यद कुरेशी या चौघांना अटक केली आहे. या चारही आरोपींना अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. हे आरोपी अंडरवर्ल्ड डॉन आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचे हस्तक आहेत. 1993: Arrest of 4 wanted accused in Mumbai blasts; Big action of Gujarat ATS !!

    – बनावट पासपोर्टच्या आधारे अहमदाबादेत

    1993 च्या बॉम्बस्फोटानंतर हे आरोपी परदेशी पळून गेले होते. परंतु आता हे आरोपी बनावट पासपोर्टचा आधार घेत अहमदाबादमध्ये आले होते. या संदर्भात गुजरात एटीएसला माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली. अबू बकर, युसूफ भटाका, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी यांनी सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी त्यांचे पत्ते बदलले होते. त्यांच्या पासपोर्टमध्ये टाकलेली सर्व माहिती खोटी होती. तपास केल्यावर हे चौघेजण 1994 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचे उघड झाले.

    – वॉन्टेड आरोपी गडाआड

    गुजरातचे दहशतवाद विरोधी पथक अटक केलेल्या चार आरोपींची चौकशी करत आहे. गुजरात एटीएसची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत वेगवेगळ्या 12 भागात सुमारे 2 तास हे बॉम्बस्फोट सुरू होते. पहिला स्फोट बॉम्बे स्टॉक एक्सचेंजजवळ दुपारी दीड वाजता आणि शेवटचा स्फोट दुपारी 3.40 वाजता सी रॉक हॉटेल येथे झाला. या प्रकरणी टाडा न्यायालयाने याकूब मेमनसह 100 आरोपींना दोषी ठरवले होते, तर 23 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

    1993: Arrest of 4 wanted accused in Mumbai blasts; Big action of Gujarat ATS !!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट