वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना तब्बल 1832 कोटी रुपयांचा प्रॉडक्टिव्हिटी बोनस जाहीर केला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. 1832 crore productivity based bonus of central government to railway employees
रेल्वे मंत्रालय आपल्या 11,27,000 कर्मचाऱ्यांना 1,832 कोटी रुपये प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड अर्थात उत्पादन आधारित बोनस देणार आहे. हा 78 दिवसांचा बोनस असेल आणि यात सर्वाधिक रक्कम सीमा 17,951 रुपये असेल, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या बोनस रकमेला आणि बोनस देण्याच्या निकषांना मंजुरी देण्यात आली आहे.
1832 crore productivity based bonus of central government to railway employees
महत्वाच्या बातम्या
- मराठा समाजासाठी चंद्रकांत पाटलांची घोषणा : प्रत्येक जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह, अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून 15 लाखांपर्यंत व्याज परतावा
- नोटाबंदीच्या विरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी : कार्यवाहीचे होणार थेट प्रक्षेपण; 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर प्रकरण
- ठाकरेंच्या मशाल चिन्हावर समता पक्षाचा दावा : निवडणूक आयोगाकडे मागितली दाद, अंधेरीत उमेदवार देणार
- मार्क झुकरबर्ग यांचा सोशल मीडिया जाएंट Meta रशियात दहशतवादी म्हणून घोषित