वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात भरडले गेलेल्या १८ हजारावर भारतीयांना विशेषतः विद्यार्थ्याना केंद्र सरकारने मायदेशी सुखरूप परत आणले आहे. 18,000 Indian natives under Operation Ganga; Student safely rescued from Ukraine battlefield
केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीयांना विमानाने मायदेशी आणले आहे. फेबुवारीपासून आजअखेर १८ हजार जण युद्धभूमीवरून परतले आहेत.
नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने या बाबतची माहिती दिली. ७५ विशेष विमानातून १५ हजार ५२१ जणांना तर हवाई दलाच्या १२ विमानातून २ हजार ४६७ जणांना मायदेशी आणले आहे. बुडापेस्ट येथून २४ विमानांनी उड्डाण त्यासाठी केले होते.