विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीन भारताबाबत डबल गेम, पाकिस्तानी सैन्याला पुरविल्या भारतीय सैन्याच्या हालचालीच्या सॅटॅलाइट इमेज पण ब्रिक्समध्ये केला पहलगाम हल्ल्याचा निषेध!!, असेच घडले.
पहलगाम मधल्या जिहादी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मधून पाकिस्तान मधल्या दहशतवादी केंद्रांवर तुफान हल्ले केले ती केंद्रे नष्ट केली. या ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीनने भारतीय सैन्याच्या हालचाली टिपणाऱ्या सॅटॅलाइट इमेज पाकिस्तानी सैन्याला पुरविल्या भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी चीनला याबद्दल एक्सपोज केले. ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने केलेल्या हल्ल्याला प्रतिकार करण्यात चिनी लष्करी सामग्री तोकडी पडली. चिनी विमाने आणि चिनी मिसाईल्स फेल गेली. पण चीनने भारतीय सैन्याच्या हालचाली टिपून त्याच्यासाठी सॅटॅलाइट इमेज पाकिस्तानी सैन्याला पुरविल्या.
एकीकडे भारताविरुद्ध अशी कुरापत काढताना दुसरीकडे चीनने ब्रिक्सच्या माध्यमातून पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध पण केला. ब्रिक्समध्ये सर्व सदस्य देशांनी काढलेल्या संयुक्त पत्रकामध्ये पाकिस्तानने पहलगाममध्ये घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला गेला या निषेध पत्रकावर चीनच्या प्रतिनिधींनी सही केली. पण भारताबद्दल मात्र ही डबल गेमच ठरली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझील मधल्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहिले पण चीनने त्यांच्या पंतप्रधानांना त्या परिषदेसाठी पाठवले चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या शिखर परिषदेला हजर राहिले नाहीत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या शिखर परिषदेला ऑनलाईन उपस्थित राहिले.
17th BRICS Summit Joint Declaration- BRICS leaders condemn Pahalgam terror attack
महत्वाच्या बातम्या
- Sonu Sood : हम बैल भेजते है… लातूरच्या वृद्ध शेतकऱ्याला अभिनेता सोनू सूदने दिली मदतीची ग्वाही
- Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेचा पहिला जथ्था रवाना; जम्मूमध्ये LG मनोज सिन्हा यांनी यात्रेला दाखवला हिरवा झेंडा
- चिनी शस्त्रे बोथट ठरली, पाकिस्तानी सेना हात पसरून अमेरिकेच्या दारात पोहचली!!
- Gujarat High Court : व्हर्च्युअल सुनावणीत वरिष्ठ वकिलांनी बिअर प्यायली; गुजरात हायकोर्टातील घटना