वृत्तसंस्था
भागलपूर : बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. गंगा नदीवर बांधण्यात येत असलेला पूल रविवारी, ४ जून रोजी कोसळला. वर्षभरापूर्वी याच पुलाचा एक एक स्लॅबही कोसळला होता. खगरियाच्या अगुवानी-सुलतानगंज दरम्यान गंगा नदीवर हा पूल बांधला जात आहे. या पूलाचा मूळ खर्च 700 कोटी रुपये होता. तो नंतर वाढून 1717 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. पुलाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याचाच परिणाम म्हणून हा पूल गंगा नदीत पडला, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा यांनी केला आहे. पुलाचे तीन खांबही नदीत बुडाले. आता या घटनेची चौकशी करण्याची घोषणा बिहार सरकारने केली आहे. 1717 crore bridge under construction in Bihar collapsed for the second time
या दुर्घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल गेल्या वर्षीही पडला होता. या पुलाच्या बांधकामाचे कंत्राट एसपी सिंगला कंपनीकडे देण्यात आलेले आहे. २०१४ मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या पुलाची पायाभरणी करण्यात आली होती. २०१५ पासून पुलाचे बांधकाम सुरू झाले. आजच्या दुर्घटनेपूर्वी देखील हा पूल गंगा नदीत पडला आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अगुवानी-सुलतानगंज मार्गावर गंगा नदीवर पूल बांधण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा पूल अचानक कोसळला. अपघात झाला तेव्हा काम थांबले होते. त्यामुळे पुलावर मजूर नव्हते. हा पूल पत्त्याच्या बंगल्यासारखा गंगेत पडल्याने नदीच्या पाण्याच्या अनेक फूट उंच लाटा उसळल्या. रस्त्याच्या कडेला बसलेले लोक घाबरले. स्थानिक लोकांनी पूल कोसळण्याच्या घटनेचा व्हिडिओ बनवला.
1717 crore bridge under construction in Bihar collapsed for the second time
महत्वाच्या बातम्या
- ताप, डोकेदुखी, मायग्रेनवर वापरल्या जाणाऱ्या १४ औषधांवर बंदी; कोडीन सिरप आणि पॅरासिटामॉलचाही समावेश!
- काँग्रेस नेते पी. चिदंबरम म्हणतात भारताने अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत स्वीकारावी; पंतप्रधानांचीही असावी फिक्स्ड टर्म
- हॉलिवूड स्टार लिओनार्दो डिकॅप्रियो भारतवंशीय तरुणीला करतोय डेट; जाणून घ्या, कोण आहे मॉडेल नीलम गिल?
- अजय बंगा यांनी स्वीकारला जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार, 5 वर्षांचा असेल कार्यकाळ; पुण्यात जन्म, अहमदाबादेतून एमबीए