• Download App
    17+ तरुणांना करता येईल मतदार ओळखपत्रासाठी अर्ज, ​​​​​​​वर्षातून 3 वेळा अर्ज करण्याची सुविधा 17+ youth can apply for voter ID card, facility to apply 3 times in a year

    17+ तरुणांना करता येईल मतदार ओळखपत्रासाठी अर्ज, ​​​​​​​वर्षातून 3 वेळा अर्ज करण्याची सुविधा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशभरातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी तरुणांना वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याची वाट पहावी लागणार नाही. त्यांना 17 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लगेचच मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करता येईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार व निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी सर्वच राज्यांतील संबंधित अधिकाऱ्यांना यासंबंधीचे निर्देश दिलेत. 17+ youth can apply for voter ID card, facility to apply 3 times in a year


    आधार कार्डचा गैरवापर? : घरबसल्या असे करू शकता चेक, येथे नोंदवा तक्रार


    वर्षातून तीनदा अर्ज करण्याची सुविधा

    पूर्वी तरुणांना 18 वर्षे पूर्ण झाल्यानतंर मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी 1 जानेवारीची वाट पहावी लागत होती. पण आता 17 वर्ष पूर्ण होताच त्यांना 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर असे वर्षातून 3 वेळा त्यांना नाव नोंदणीसाठी अर्ज करता येईल. नव्या निर्देशांनुसार, मतदार यादी प्रत्येक 3 महिन्यांना अपडेट होईल. पात्र तरुणांची नावे पुढील वर्षाच्या तिमाहीत व्होटर लिस्टमध्ये जोडण्यात येईल.

    आयोगाने सांगितले की, नोंदणी झाल्यानंतर तरुणांना एक मतदार ओळखपत्र दिले जाईल. सद्यस्थितीत व्होटर लिस्ट 2023 साठी दुरुस्त केली जात आहे.

    व्होटर लिस्ट आधारशी लिंक करण्याची तयारी

    निवडणूक आयोगाने आधार क्रमांक मतदार यादीशी लिंक करण्याचीही प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबवली जाईल. या मोहिमेत मतदार यादीत समाविष्ट प्रत्येकाचे नाव आधार क्रमांकाशी जोडल जाईल.

    17+ youth can apply for voter ID card, facility to apply 3 times in a year

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Operation Sindoor : पाकिस्तानला आत घुसून मारणार, बचावाची एकही संधी नाही देणार; आदमपूर हवाई तळावरून मोदींची गर्जना!!

    Dr. Subbanna Ayyappan : पद्मश्री डॉ. सुब्बन्ना अय्यपन यांचा संशयास्पद मृत्यू; श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीत मृतदेह आढळला

    Posters of Pahalgam : पहलगाम दहशतवाद्यांचे पोस्टर्स प्रसिद्ध, २० लाख रुपयांचा इनाम जाहीर