• Download App
    Positive news : १७.७२ कोटी लोकांचे लसीकरण झालेय;१८७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आकडा घटतोय; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती|17.72 crore doses of COVID19 vaccine have been administered till now

    Positive news : १७.७२ कोटी लोकांचे लसीकरण झालेय;१८७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आकडा घटतोय; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनाचा फैलाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून एक Positive news आली आहे. देशात १८७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची आकडेवारी गेले दोन आठवडे कमी होताना दिसते आहे.17.72 crore doses of COVID19 vaccine have been administered till now

    आतापर्यंत १७ कोटी ७२ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव आगरवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.



    ४५ वयोगटाच्या पुढच्या १३ कोटी ५३ लाख लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. १ कोटी ६२ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच २ कोटी २२ लाख फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती देखील लव आगरवाल यांनी दिली आहे.

    ४५ वयोगटाच्या पुढच्या १३ कोटी ५३ लाख लोकांना लस दिली गेली आहे, याचा अर्थ त्या वयोगटातल्या एक तृतीयांश लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणाच्या बाबतीत भारत जगात सध्या तिसऱ्या क्रमांकांवर आहे.

    अमेरिकेत २६ कोटी लोकांना लस दिली गेली आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिली. भारतात पहिल्या लाटेपासून आत्तापर्यंत झालेल्या एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंपैकी ८८ टक्के मृत्यू हे ४५ च्या पुढच्या वयोगटातील नागरिकांचे झाले आहेत,

    अशी आकडेवारी पॉल यांनी मांडली. ४५ पुढच्या वयोगटाच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन आपण मोठ्या लोकसंख्येचा कोरोनापासून बचाव केला आहे, असे पॉल म्हणाले.

    17.72 crore doses of COVID19 vaccine have been administered till now

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो