• Download App
    मोदी सरकारची दिवाळी भेट : आज पीएम किसान सन्मान निधीचे 16000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा!!16000 crore rupees of PM Kisan Samman Fund deposited in farmers' accounts today

    मोदी सरकारची दिवाळी भेट : आज पीएम किसान सन्मान निधीचे 16000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : खरीप हंगाम संपुष्टात येताना आणि रब्बी हंगामाची सुरुवात होताना केंद्रीय कृषि मंत्रालयाने आज आणि उद्या 17 आणि 18 ऑक्टोबर 2022 रोजी केंद्रीय कृषी अनुसंधान संस्थेत शेतकरी महासंमेलन आयोजित केले आहे. 16000 crore rupees of PM Kisan Samman Fund deposited in farmers’ accounts today

    या शेतकरी महासंमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 16 हजार कोटी रुपय जमा करणार आहेत.



    पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 2022 चा हा 12 वा हप्ता असून ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर करोडो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे वन नेशन, वन फर्टिलायझर या उपक्रमाची सुरवात करणार असून देशातल्या 600 कृषी समृद्धी केंद्रांचे उद्घाटन देखील करणार आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या संदर्भात माहिती दिली.

    केंद्रीय कृषी अनुसंधान संस्थेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय शेतकरी महासंमेलनात नैसर्गिक शेती, हवामान बदलाचा शेतीवर परिणाम तसेच किफायतशीर शेती या विषयावर भर देऊन विविध परिसंवाद घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर एक कृषी उत्पादन महाप्रदर्शन देखील यानिमित्ताने आयोजित केले आहे.

    16000 crore rupees of PM Kisan Samman Fund deposited in farmers’ accounts today

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित