वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात मध्ये सौराष्ट्र आणि कच्छच्या किनाऱ्याबरोबरच पाकिस्तानला धडकणार आहे. 15 जून रोजी याचा पर प्रत्यक्ष परिणाम दिसायला लागेल. 15th June 95 trains will remain cancelled due to the effect of Biparjoy
पण त्यापूर्वीच केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मदत आणि बचाव कार्य संदर्भातील पाऊले उचलली असून त्यातला पहिला भाग म्हणून पश्चिम रेल्वेच्या 56 गाड्या आज रद्द केल्या, त्याचबरोबर उद्यापासून 15 जून पर्यंत आणि त्यानंतर आवश्यकता भासेल तोपर्यंत एकूण 95 रेल्वे गाड्या स्थगित करण्यात आले आहेत.
बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात मध्ये सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी तसेच पाकिस्तानच्या समुद्रकिनाऱ्यावर साधारण ताशी 125 किलोमीटर वेगाने धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने किनारपट्टीच्या भागातील जनतेला सावधानतेचा इशारा तर दिला आहेच. पण त्याचबरोबर प्रवासाची साधने आणि बाकीचे नुकसान होऊ नये या दृष्टीने रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच 95 रेल्वे गाड्या स्थगितही केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणामाचा एका बैठकीत आढावा घेतला. अधिकाऱ्यांना आणि इंडिया सूचना दिल्या. गुजरात मुंबई येथे सतर्कतेचे आदेश दिले. राज्यातील यंत्रणांनाही सज्ज ठेवण्याचे आदेश दिले. संबंधित बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय गृह सचिव तसेच केंद्रातील वरिष्ठ अधिकारी आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
15th June 95 trains will remain cancelled due to the effect of Biparjoy
महत्वाच्या बातम्या
- Religious Conversion : ऑनलाइन गेमिंगद्वारे धर्मांतराचा सापळा रचणाऱ्या शाहनवाजला मुंबईतून अटक
- पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नितीश कुमार बाहेर, तर मग उरलेत किती??
- न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका! वारकऱ्यांची सुरक्षा महत्वाची – देवेंद्र फडणवीस
- आळंदीत लाठीमार झालेला नाही, देवेंद्र फडणवीसांचा स्पष्ट खुलासा