विशेष प्रतिनिधी
बीजिंग : जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरणाची मोडतोड करून केला जाणारा बेसमार विकास यांची चांगलीच फळे आता चीनला भोगावी लागत आहे. चीनमध्ये गेल्या हजार वर्षांत झाला नाही इतका मुसळधार पाउस यंदा झाला आहे. त्यामुळे अनेक नद्यांना महापूर आला आहे. 150 peoples died in china due to flood
चीनच्या हेनान प्रांतात होणाऱ्या पावसामुळे आलेल्या पुराने आतापर्यंत दीडशेहून अधिक नागरिकांचे बळी गेले आहेत. तसेच किमान पाचशे जण बेपत्ता झाले असून त्याचा तपास सुरू आहे.
हेनान प्रांताच्या सरकारने म्हटले की, पूरग्रस्त भागातील सुमारे ६.७ लाख नागरिकांना वाचविण्यात आले तर सुमारे ९.२ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. काही भागातील पाणी कमी झाले असले तरी अनेक ठिकाणी स्थिती वाईटच आहे. पूरग्रस्त भागात मदतकार्य आणि स्वच्छता मोहीम वेगाने राबवली जात आहे.
रस्ते व कारखानदारी वाढवण्यासाठी या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व डोंगर सपाटीकरण केले जात आहे. त्याचे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहेत.
150 peoples died in china due to flood
महत्त्वाच्या बातम्या
- सरन्यायाधिशाच्या नियुक्तीविरोधात खोडसाळपणे याचिका करणाऱ्याला पाच लाख रुपये दंड, व्यावसायिक याचिकाकर्त्यांना न्यायालयाचा दणका
- प्रशांत किशोर म्हणतात राहूल गांधींशी मतभेद, मोदींना हरविण्यापेक्षा पक्ष पुन्हा उभा करण्यावर त्यांनी द्यावा भर
- व्होट बॅँकेच्या राजकारणाला भाजपा घाबरत नाही, अमित शहा यांनी दिला इशारा
- महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे पण त्याची सुरूवात तुमच्या मालकाच्या कलानगरातून करा, संजय राऊतांवर टीका करताना नितेश राणे यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा
- लोकवर्गणीतून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शन दिलेली चिमुकल्या वेदीकाचा मृत्यू