• Download App
    छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी चकमकीनंतर 15 जवान बेपत्ता, 5 शहीद, 30 जखमींवर उपचार सुरू । 15 jawans missing, 5 martyred, 30 injured after clashes with Naxals in Chhattisgarh

    छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी चकमकीनंतर 15 जवान बेपत्ता, 5 शहीद, 30 जखमींवर उपचार सुरू

    clashes with Naxals in Chhattisgarh : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात शनिवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान पाच जवान शहीद झाले. आता छत्तीसगड पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चकमकीनंतर कमीतकमी 15 जवान बेपत्ता झाले आहेत. त्याचवेळी शहीद झालेल्या पाच जवानांपैकी 2 जणांचे पार्थिवही ताब्यात घेण्यात आले आहेत. 15 jawans missing, 5 martyred, 30 injured after clashes with Naxals in Chhattisgarh


    वृत्तसंस्था

    विजापूर : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात शनिवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान पाच जवान शहीद झाले. आता छत्तीसगड पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चकमकीनंतर कमीतकमी 15 जवान बेपत्ता झाले आहेत. त्याचवेळी शहीद झालेल्या पाच जवानांपैकी 2 जणांचे पार्थिवही ताब्यात घेण्यात आले आहेत.

    पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, चकमकीत जखमी झालेल्या 23 जवानांना विजापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर 7 जवानांना रायपूर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

    राज्यातील नक्षलविरोधी कारवाईचे पोलीस उपमहानिरीक्षक ओपी पाल यांनी शुक्रवारी रात्री सांगितले होते की, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफची संयुक्त टीम नक्षलविरोधी कारवाईत रवाना झाली. ते म्हणाले की, विजापूर जिल्ह्यातील ताररेम, उसूर व पामिड आणि सुकमा जिल्ह्यातील मिनापा व नरसपुरम येथून सुमारे दोन हजार जवान नक्षलविरोधी कारवाईत सहभागी होते.

    पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी 12च्या सुमारास विजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडा पोलीस स्टेशन परिसरातील जोनागुडा गावाजवळ नक्षलवाद्यांची पीएलजीए बटालियन आणि तारिमच्या सुरक्षा दलांमध्ये चकमकी झाली. ही चकमकी तीन तासांहून अधिक काळ चालली.

    पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलाने घटनास्थळावरून एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

    यापूर्वी 23 मार्च रोजी नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून बस उडविली होती. या घटनेत डीआरजीचे पाच जवान शहीद झाले होते.

    15 jawans missing, 5 martyred, 30 injured after clashes with Naxals in Chhattisgarh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे