clashes with Naxals in Chhattisgarh : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात शनिवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान पाच जवान शहीद झाले. आता छत्तीसगड पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चकमकीनंतर कमीतकमी 15 जवान बेपत्ता झाले आहेत. त्याचवेळी शहीद झालेल्या पाच जवानांपैकी 2 जणांचे पार्थिवही ताब्यात घेण्यात आले आहेत. 15 jawans missing, 5 martyred, 30 injured after clashes with Naxals in Chhattisgarh
वृत्तसंस्था
विजापूर : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात शनिवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान पाच जवान शहीद झाले. आता छत्तीसगड पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चकमकीनंतर कमीतकमी 15 जवान बेपत्ता झाले आहेत. त्याचवेळी शहीद झालेल्या पाच जवानांपैकी 2 जणांचे पार्थिवही ताब्यात घेण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, चकमकीत जखमी झालेल्या 23 जवानांना विजापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर 7 जवानांना रायपूर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
राज्यातील नक्षलविरोधी कारवाईचे पोलीस उपमहानिरीक्षक ओपी पाल यांनी शुक्रवारी रात्री सांगितले होते की, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफची संयुक्त टीम नक्षलविरोधी कारवाईत रवाना झाली. ते म्हणाले की, विजापूर जिल्ह्यातील ताररेम, उसूर व पामिड आणि सुकमा जिल्ह्यातील मिनापा व नरसपुरम येथून सुमारे दोन हजार जवान नक्षलविरोधी कारवाईत सहभागी होते.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी 12च्या सुमारास विजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडा पोलीस स्टेशन परिसरातील जोनागुडा गावाजवळ नक्षलवाद्यांची पीएलजीए बटालियन आणि तारिमच्या सुरक्षा दलांमध्ये चकमकी झाली. ही चकमकी तीन तासांहून अधिक काळ चालली.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलाने घटनास्थळावरून एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
यापूर्वी 23 मार्च रोजी नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून बस उडविली होती. या घटनेत डीआरजीचे पाच जवान शहीद झाले होते.
15 jawans missing, 5 martyred, 30 injured after clashes with Naxals in Chhattisgarh
महत्त्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीत तुझं नी माझं जमेना : संजय राऊत अन् नाना पटोले आमने-सामने ; थेट मुख्यमंत्र्यांना इशारा
- भारतीय जवानांची माणुसकी, सीमा पार करून चुकून भारतात आलेल्या आठ वर्षांच्या करीमला केले पाकिस्तानी रेंजर्सच्या सुपूर्द
- रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, ५ एप्रिलपासून आरक्षणाशिवाय करता येणार प्रवास, ७१ गाड्या सुरू होणार
- राष्ट्रवादीचे पदाधिकारी चिरीमिरीसाठी विकले जाताहेत, सत्ताधाऱ्यांशी सेटींग, अजित पवार यांचाच आरोप
- लग्न करून घरी आणले आणि बायकोला दहशतवाद्यांना विकून टाकलं, केरळमधील लव्ह जिहादमुळे ख्रिश्चन समाज संतप्त