विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केरळमधील 14 जिहादी इसिस खोरासनमध्ये दाखल झाले आहेत. काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने केरळमधील 14 जणांना बगराम तुरुंगातून मुक्त केले आणि ते सर्व इस्लामिक स्टेट ऑफ खोरासन प्रांत (आयएसकेपी) मध्ये सामील झाले आहेत.14 jihadists from Kerala enter ISIS Khorasan, plot to blow up outside Turkmenistan embassy in Kabul
दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या केरळच्या या दहशतवाद्यांनी 26 ऑगस्ट रोजी काबुलमधील तुर्कमेनिस्तान दूतावासाबाहेर स्फोट घडवण्याचा कट रचला होता, मात्र सुरक्षा दलांनी तो हाणून पाडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी दोन पाकिस्तान्यांना अटक केल्याची बातमी आहे.
या 14 जिहादींपैकी एकाने त्याच्या घरी संपर्क साधला, तर उर्वरित 13 जिहादी इस्लामिक स्टेट ऑफ खोरासन प्रांत म्हणजेच काबूलमधील आयएसकेपी दहशतवाद्यांसह फरार आहेत. 2014 मध्ये इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया आणि लेव्हेंटने मोसुलवर कब्जा केल्यानंतर मलप्पुरम, कासारगोड आणि कन्नूर जिल्ह्यात राहणाऱ्या या केरळच्या युवकांनी जिहादी गटात सामील होण्यासाठी भारत सोडला. यापैकी काही दहशतवाद्यांची कुटुंबे आयएसकेपी अंतर्गत स्थायिक होण्यासाठी अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात दाखल झाली.
केरळी जिहादी युवक अफगाणिस्तानच्या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याने पाक प्रेरित दहशतवादी संघटना भारताची बदनामी करण्यासाठी त्यांचा वापर करू शकतात. तालिबान अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले घडवून भारताची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी कट्टरपंथी केरळींचा वापर करू शकतात.
14 jihadists from Kerala enter ISIS Khorasan, plot to blow up outside Turkmenistan embassy in Kabul
महत्त्वाच्या बातम्या
- संपादक, लेखक आनंद अंतरकर यांचे निधन
- पुणे महापालिकेचा तुघलकी आदेश, कोरोना नियमभंग करणाऱ्यांकडून दिवसाला दहा लाख रुपये वसूल करा
- मुख्यमंत्री खट्टर यांना विरोध करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज, राहुल गांधी म्हणाले – फिर खून बहाया किसान का
- स्मार्ट पार्किंगला मुंबईत सुरुवात आधुनिक सुविधेला नागरिकांचा तुफान प्रतिसाद